चक्क! चोरानेच पळवली पोलीस शिपायाची वर्दी

चक्क! चोरानेच पळवली पोलीस शिपायाची वर्दी
bhandara police

भंडारा पोलिसात (Bhandara Police) कार्यरत असलेले पोलिस शिपाई यांची  वर्दीच त्याच्या घरुन चोराने चोरुन नेल्याच्या धक्कादायक प्रकार भंडारा शहरात उघड़ झाला असून ह्या प्रकरणी भंडारा शहर पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस शिपाई कौशिक गजभिये असे वर्दी चोरीला गेलेल्या शिपायाचे नाव असून भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात कार्यरत आहेत. (The policeman's uniform was stolen by the thief)

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात कार्यरत असलेले पोलिस शिपाई कौशिक गजभिये हे भंडारा शहरात संत तुकडोजी वार्ड,एलआयसी ऑफिसच्या मागे भाड्याने  राहतात. 5 जून ला घटनेच्या दिवशी मध्यरात्री ते आपल्या कर्तव्यावर असतांना त्यांच्या घरातील गेट खालून अज्ञात चोराने आत प्रवेश करत हँगरवर लटकवलेली जूनी वापरती खाकी रंगाची वर्दी -पैंट, नावाची नेम प्लेट, शर्ट वरील पोलिस टॅग, बक्कल नंबर असलेली बेल्ट आणि किंम्मत 1,500 रुपये व 200 रुपये किंमतीची बॅग आणि खाली असलेल्या रूमचे लॉक तोडून 3,000 रुपये घेऊन गेला.  

हे देखील पाहा

दुसऱ्या दिवशी सकाळी ड्यूटी संपवून घरी परतल्यावर हा प्रकार उघडिस आला आहे. या घटनेची माहिती पोलिस शिपाई गजभिये यांनी वरिष्ठांना दिली असून भंडारा शहर पोलिसात अज्ञात चोरा विरुद्ध तक्रार देत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास भंडारा शहरपोलिस करीत आहे. या घटनेनेनंतर "पोलिसांची वर्दी चोरीला जाऊ लागल्याने आता भंडारा पोलिसांचा चोरांना धाक राहिला नाही का? हा प्रश्न उभा राहिला आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com