प्रशांत किशोर आणि शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट की नवी रणनीती ?

प्रशांत किशोर आणि शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट की नवी रणनीती ?
1Sharad_20Pawar_20_20Prashant_20Kishore.jpg

मुंबई - राजकीय सल्लागार आणि रणनितिकार प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांची भेट घेतली. त्यामुळे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ही भेट केवळ भेट होती की आगामी निवडणुकीसाठी पवारांची सुरू झालेली रणनीती. Prashant Kishor and Sharad Pawars meet are goodwill or New strategies

पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या trinamool congress ऐहिहासिक विजयाबाबत प्रशांत किशोर यांचं कौतुक झालं. समोर भाजपचे मोठे आव्हान असताना ममता बॅनर्जी यांच्या विजयाची शिल्पकार म्हणून प्रशांत किशोर यांचीच संपूर्ण देशात वाहवा झाली.

या निवडणुकीनंतर राजकीय सल्लागार म्हणून आपण निवृत्ती घेत असल्याचं प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं. पण आता प्रशांत किशोर यांनी सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाल्याने संपूर्ण देशाचे लक्ष पुन्हा एकदा या बैठकीकडे लागल्याचं समजतंय. पण प्रशांत किशोर यांनी निवडणुकीत न पडणार असल्याचं स्पष्ट केल्याने या भेटीत असं विशेष काही नसल्याचं खुद्द अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. Prashant Kishor and Sharad Pawars meet are goodwill or New strategies

2014 मध्ये मोदी सरकार आणण्यासाठी जी रणनीती वापरली त्यानंतर प्रशांत सावंत यांचे नाव सर्वत्र चर्चेत आले. प्रशांत किशोर यांची मदत त्यानंतर देशातील अनेक राजकीय नेत्यांनी घेतली. महत्वाचं म्हणजे ज्यांनी प्रशांत किशोर यांचा राजकीय सल्ला घेतला त्यातील अनेकांना निवडणुकीत उत्तम यश मिळाल्याचे दिसून आले.

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार म्हणून भूमिका बजावली होती. उद्धव ठाकरे यांनाही ते भेटले होते, पण ही भूमिका थेट नव्हती, अनौपचारिक केलेली मदत शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी खूप फायदेशीर ठरली. Prashant Kishor and Sharad Pawars meet are goodwill or New strategies

2024 च्या निवडणुका जरी लांबणीवर असल्या तरी त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसने आत्तापासूनच केली आहे. अनेक बैठका, चर्चा, त्याचप्रमाणे मतदारांशी संवाद अशा पद्धतीची तयारी सध्या राष्ट्रवादीची  सुरू आहे. पण याच सोबत प्रशांत किशोर यांची साथ मिळाली तर 2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यास मदत होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

हे देखील पहा -

यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना अनेकांची पसंती असल्यामुळे त्याही बाबतीत प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा झाली असल्याचं मतही व्यक्त करण्यात येत आहे. सिल्व्हर ओक येथे झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या आरोग्य विषयी चर्चा झाली असणारच मात्र राष्ट्रवादीच्या आगामी राजकीय प्रवासाबाबत आणि निवडणुकीबाबत देखील महत्त्वपूर्ण चर्चा झाली असणारच यात काही वाद नाही अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com