आणखी एका मराठी सिने कलाकाराचा अपघात

आणखी एका मराठी सिने कलाकाराचा अपघात

पुणे : प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते, प्रविण विठ्ठल तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या गाडीला मंगळवारी रात्री 11 वाजता सासवडमध्ये अपघात झाला आहे. त्यांच्यासोबत कार्यकारी निर्माते विशाल चांदणे आणि अभिनेते रमेश परदेशी हेसुद्धा होते.

सासवडजवळ हिवरे गावात महादेव मंदीराजवळ हा अपघात झाला. अपघात होताच गाडीतील एअर बॅग्स उघडल्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. दरम्यान, अपघाताबाबत सोशलमीडियावर चुकीचे मेसेजेच फिरत होते परंतूश प्रविण तरडे, रमेश परदेशी आणि विशाल चांदणे यांना काहीही झाले नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. ते सुखरूप पुण्यात पोहचले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

WebTittle : Pravin tarde car accident 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com