मान्सूनपूर्व कामांची लगबग; शेतात पेरणीसाठी शेतकरी राजा सज्ज

मान्सूनपूर्व कामांची लगबग; शेतात पेरणीसाठी शेतकरी राजा सज्ज
Pre monsoon farming has started in Nandurbar district

नंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यात मान्सून पूर्व Pre-Monsoon शेतीच्या मशागतीची कामांची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बळीराजा कडून बैलजोडी द्वारे तर काही ठिकाणी ट्रॅक्‍टरच्या साह्याने नांगरणी, वखरणी व जमीन सपाटीकरणाचे काम सुरू असल्याचे चित्र आहे. Pre-monsoon farming has started in Nandurbar district

मुंबई Mumbai उपनगरात सुरू झालेला पाऊस Monsoon दोन दिवसांनी जिल्ह्यात येतो, असा शेतकऱ्यांचा अंदाज असल्याने मान्सूनपूर्व कामांना गती दिली जात आहे. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापूस पिकाची जवळपास एक लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड केली जाते. 

गेल्या वर्षी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात नुकसान झाल्याने यंदा कापूस पीक रोगमुक्त व चांगले यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर यंदा शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची आशा आहे. 

हे देखील पहा - 

जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण असून ऊन सावलीचा खेळ आहे. हवामान विभागाच्या Meteorological Department माहितीनुसार दोन दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com