खासगी वैद्यकीय केंद्रांना लसीकरण केंद्र नोंदणीसाठी  'या' चार अर्हता पूर्ण कराव्या लागतील
vaccine

खासगी वैद्यकीय केंद्रांना लसीकरण केंद्र नोंदणीसाठी  'या' चार अर्हता पूर्ण कराव्या लागतील

महाराष्ट्रात आता करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुंगांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्व  नागरिकांना लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही 1 मे पासून व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.   Private medical centers will have to meet four of these qualifications for vaccination center registration

मुंबईत या वयोगटातील नागरिकांची संख्या सुमारे ९० लाख इतकी आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी पुरेशी शीतसाखळी, जागा व मनुष्यबळ आदी निकषांची पूर्तता करीत असलेल्या खासगी वैद्यकीय केंद्रांनी लसीकरण केंद्र नोंदणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करावेत, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे. खासगी लसीकरण केंद्रात पात्र अर्हता असलेल्या खासगी लसीकरण केंद्रांनी आपले अर्ज नोंदणीसाठी आपल्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात देणे आवश्यक आहे. त्यानंतर या खासगी लसीकरण केंद्राची नोंदणी कोविन पोर्टलवर करणे सुलभ होईल अधिक माहितीसाठी आपल्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

लसीकरणासाठी 'या' चार अर्हता पूर्ण कराव्या लागतील

- प्रत्येक लसीकरण केंद्रात लस साठवणुकीसाठी पुरेशी शीतसाखळी उपकरणे असणे आवश्यक आहे.

- लसीकरण केंद्रात लाभार्थ्यांसाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.

- लसीकरणासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ असणे आवश्यक आहे.

- लसीकरणामुळे प्रतिकूल घटना घडल्यास त्यावर योग्य उपचारांची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

Edited By - Shivani Tichkule
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com