कसला कारभार हा? 15 महिन्यानंतर महिला क्रिकेट संघाला मिळाली बक्षीसाची रक्कम

कसला कारभार हा? 15 महिन्यानंतर महिला क्रिकेट संघाला मिळाली बक्षीसाची रक्कम
women cricket team

टी -20 विश्वचषकाच्या (T-20 World Cup) 15 महिन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला खेळाडूंना बक्षिसाची रक्कम दिली आहे.  माध्यमांकडून मिळलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने महिला संघाला साडेतीन कोटी रुपये दिल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर घरगुती क्रिकेटपटूंना अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी -20 विश्वचषकात भारतीय महिला संघ उपविजेते ठरला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) उपविजेत्या संघाला साडेतीन कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे.(The prize money was received from the BCCI after 15 months)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्यावतीने स्पर्धा संपल्यानंतर आठवडाभरात ही रक्कम बीसीसीआयकडे पाठवण्यात आली होती, जेणेकरून ती खेळाडूंना देण्यात येईल. परंतु, बीसीसीआयने ही रक्कम वितरित केली नाही. यूकेच्या एका वृत्तपत्रात टी -20 विश्वचषकाच्या उपविजेत्या भारतीय संघाला आतापर्यंत बक्षिसाची रक्कम न दिल्याचे उघडकीस झाले आहे. त्यानंतर, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ही रक्कम टी -20 विश्वचषकात सहभागी असलेल्या सर्व महिला खेळाडूंना वितरित करण्यात आली आहे.

हे देखील पाहा

भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर
भारतीय महिला संघ पुरुष संघासोबत 2 जून रोजी इंग्लंडला रवाना झाला आहे. महिला संघाला इंग्लंडविरुद्ध 16 जूनपासून एक कसोटी आणि तीन एकदिवसीय आणि तीन टी- 20  सामन्यांची मालिका खेळायची आहे. महिला संघ सध्या ब्रिस्टलमध्ये विलगीकरणात आहे. त्याचबरोबर पुरुष संघाला न्यूझीलंडविरुद्ध 18 ते 22 जून दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे.

पहिला कसोटी सामना 16 जूनपासून 
भारतीय संघाला 16 पासून ब्रिस्टलमध्ये एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर, 27 जून रोजी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना ब्रिस्टलमध्येच खेळाला जाणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 30 जून रोजी टॉन्टनमध्ये होईल, तर एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना 3 जुलै रोजी वॉरेस्टर येथे खेळला जाईल. त्याचबरोबर तीन टी-20 मालिकेचा पहिला सामना नॉर्थम्प्टन येथे 9 जुलैपासून खेळला जाणार आहे आणि टी-20 चा शेवटचा सामना 14 जुलै रोजी चेम्सफोर्ड येथे खेळला जाणार आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com