भारतात 'या' महिन्यात सुरु होणार रशियाच्या स्पुटनिक V लसीचे उत्पादन

Production of Russian Sputnik V vaccine will start in India in August
Production of Russian Sputnik V vaccine will start in India in August

नवी दिल्ली : भारताच्या India लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही Sputnik V या लसीचा समावेश झाला आहे. नागरिक लवकरच रशियाच्या Russia स्पुटनिक-व्ही लस घेऊ शकणार आहेत. या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून भारत देशात स्पुटनिकचे उत्पादन सुरू होणार आहे. अशी माहिती रशियामधील भारताचे राजदूत डीबी वेंकटेश वर्मा यांनी दिली आहे. Production of Russian Sputnik V vaccine will start in India in August

वर्मा म्हणाले आहेत कि , मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला स्पुतनिकच्या 30 लाख  डोसचा पुरवठा करण्यात येईल. आणि त्याच्या पुढील जून महिन्यात वाढवून 50 लाखापर्यंत पुरवठा होण्याची आमची अपेक्षा आहे. आणि यानुसार देशात यावर्षी स्पुटनिक-व्हीच्या लसीच्या 85 कोटीहून अधिक लस तयार केल्या जातील. Production of Russian Sputnik V vaccine will start in India in August

हे देखील पहा -

भारतात रशियाची लस स्पुटनिक-व्हीची किंमतवर शिक्कामोर्तब झाले आहे. या लसीची मूळ किंमत 948 रुपये आहे. तर यावर पाच टक्के जीएसटी लागू होईल आणि लागल्यानंतर त्याच्या एका लसीच्या डोसची किंमत 995 रुपये असेल. 1 मे रोजी रशियन लस स्पुटनिक-व्हीची पहिली खेप भारतात आली होती. 13 मे 2021 रोजी कसौलीच्या सेंट्रल फार्मास्युटिकल लॅबोरेटरीकडून Kasauli's Central Pharmaceutical Laboratory ही लस मंजूर झाली होती. 

रशियाची कोरोना लस Sputnik V कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक असल्याचा दावा  रशियाकडून केला जात आहे. रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने Gamaleya Research Institute दावा केला आहे की Sputnik V लस ही कोरोनावर 91.6 टक्के प्रभावशाली आहे. 

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com