मुलगा होत नसल्यानं आत्महत्येस केलं प्रवृत्त; नवऱ्याच्या घरासमोरच जाळला मृतदेह

मुलगा होत नसल्यानं आत्महत्येस केलं प्रवृत्त; नवऱ्याच्या घरासमोरच जाळला मृतदेह
crime

जुन्नर: मुलगा होत नाही म्हणून दुसऱ्या लग्नाला परवानगी द्यावी यासाठी सातत्याने छळ करणाऱ्या नवऱ्याने मारहाण केल्याने धनगर समाजातील एका विवाहितेने आपल्या लहान दीड वर्ष वयाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार जुन्नर तालुक्यातील हिवरे नारायणगाव परिसरात घडला आहे. याबाबत नारायणगाव पोलिसांमध्ये पती, सासू, सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून खून करून मुलीला विहीरीत टाकल्याची तक्रार मुलीच्या आई-वडिलांनी केली आहे.(Prone to suicide because she is not having a son Burnt body in front of husband's house)

मृतदेह पोलिसांच्या समोरच घरासमोर जाळल्याने मात्र परिसरात खळबळ उडाली आहे. हिवरे नारायणगाव येथील रंजना अविनाश तांबे व तिची छोटी मुलगी या दोघींचा मृतदेह येथील जवळच असलेल्या विहिरीमध्ये सापडल्याने रंजनाचे वडील बुधा बबन ठवरे (वय वर्ष 50 ) राहणार ढवळपुरी तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालाा आहे.

हे देखील पाहा 

रंजनाचा सातत्याने तिचा नवरा अविनाश तांबे व सासरचे लोक वारंवार मारहाण करून शिवीगाळ करून वेळेवर जेवण न देणे व प्रमाणापेक्षा जास्त काम करुण घेने, घालून पाडून बोलणे,  शिवीगाळ करणे असे वारंवार त्रास देऊन जीवन नकोसे केले. आणि म्हणून दुसऱ्या लग्नाला तिच्याकडून संमती मिळविण्यासाठी मारहाण करणे, तिच्याकडून करारनामा लिहून घेणे जबरदस्तीने सही करण्यास भाग पडणे असे वारंवार त्रास देऊन तिला जीवन नकोसे केले होते. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com