मोदी सरकारचा शेतकरी संघटनांकडून काळ्या फिती बांधून निषेध

मोदी सरकारचा शेतकरी संघटनांकडून काळ्या फिती बांधून निषेध
farmer protest.

सत्यशोधक शेतकरी सभा व श्रमिक शेतकरी संघटने तर्फे संपूर्ण देशामध्ये आज काळा दिवस पाळण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या (Government of India) विरोधामध्ये या संघटनेतर्फे साक्री (Sakri) तालुक्यातील तहसील कार्यालया बाहेर काळया फिती लावून निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा देखील या ठिकाणी संघटनेतर्फे निषेध नोंदवण्यात आला आहे.(Protest against Modi government by tying black ribbons by farmers' organizations)

शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला असून शासनातर्फे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येते. परंतु यामध्ये बँक अधिकारी मनमानी कारभार करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकाराकडून व्याजाने कर्ज घ्यावे लागत आहे. त्याचबरोबर आसमानी संकटानंतर आलेले पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्याला याची आत्महत्या करून परतफेड करावी लागते. म्हणून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा व श्रमिक शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

दरम्यान, मागच्या काही महिन्यांत केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्यां विरोधात अनेक राज्यातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर बसून आहेत. 9 ऑगस्ट 2020 रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले. या आंदोलनाला 9 महिने होऊन गेले आहेत, तरीही शेतकरी आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत. देशातील विविध शेतकरी संघटनांनी पुढाकार घेऊन आंदोलन करणायचा विचार केला होता. अशातच धुळ्यामधे केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी असल्याच्या घोषणा दिल्या गेल्या.    

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com