पालकमंत्री सुनील केदार यांचा ताफा अडवून मांडल्या समस्या

पालकमंत्री सुनील केदार यांचा ताफा अडवून मांडल्या समस्या
The protesters blocked the vehicles of Guardian Minister Sunil Kedar

वर्धा: लॉकडाउनचा Lockdown फटका सलून Salon, ब्युटी पार्लर व्यावसायिकांनाही खूप मोठ्या प्रमाणात बसला आहे. सलून ब्युटी पार्लर व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्यासह इतर मागण्यांसाठी पालकमंत्री सुनील केदार Sunil Kedar यांचा ताफा अडवून मागण्या मांडण्यात आले. पालकमंत्र्यांचा ताफा अडवताच एकच खळबळ निर्माण झाली. The protesters blocked the vehicles of Guardian Minister Sunil Kedar

पालकमंत्री सुनील केदार नागपूरहुन Nagpur वर्ध्याला Wardha येत असताना, पवनार गावाजवळ आंदोलकांनी त्यांच्या गाडयांचा Cars ताफा अडवला. सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या वतीने यावेळी आंदोलन करण्यात आलं आहे. आंदोलकांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री केदार यांनी वाहनातून उतरून त्यांच्याशी चर्चा केली आहे. 

आत्महत्याग्रस्त सलून दुकानदारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, सलून ब्युटी पार्लर दुकानदार, कारागीरांना स्वतंत्र पॅकेज Package देत महिन्याला सात हजार रुपये द्यावे,  लॉकडाउन काळातील दुकानभाडे Shop rent आणि वीज बिल माफ करावं, तसेच सुरक्षा इन्शुरन्स कवच, फ्रंटलाईन दर्जा देत लस द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आले आहेत. The protesters blocked the vehicles of Guardian Minister Sunil Kedar

हे देखील पहा 

लॉकडाउनचा आर्थिक फटका सलून, ब्युटी पार्लर तसेच व्यावसायिकांनाही बसला असल्याने हा ताफा जवळपास दहा मिनिट थांबला होता. या ताफ्यातील सर्व आदोलकांना पोलिसांनी Police ताब्यात घेतलं आहे. 

Edited By- Digambar Jadhav
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com