भयानक! पुण्यात प्रविण महाजन या गुंडानं पोलिसांची केली हत्या, पहा व्हिडिओ...

भयानक! पुण्यात प्रविण महाजन या गुंडानं पोलिसांची केली हत्या, पहा व्हिडिओ...
crime

पुणे : तडीपार गुंडाने मध्यरात्री पोलीस Police फौजदारावर चाकूने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीज Shrikrishna Talkies जवळ मध्यरात्री सव्वा बारा वाजता हा प्रकार घडला आहे. पोलीस फौजदार समीर सय्यद ( वय ४८ रा. कडक पोलीस वसाहत ) असे खून झालेल्या पोलिसाचे नाव आहे. In Pune a goon named Pravin Mahajan killed a policeman

या प्रकरणी फरासखाना Faraskhana पोलिसांनी तडीपार गुंड प्रवीण महाजन ( वय ३४ रा. कसबा पेठ ) याला अटक केली आहे. प्रवीण महाजन याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला आतापर्यंत दोनदा तडीपार केले आहे. असे असताना देखील त्याची गुंडगिरी संपली नव्हती.

पोलीस फौजदार समीर सय्यद हे सध्या फरासखाना पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. काल रात्री ते ड्युटी Duty वरून घरी जात असताना, श्रीकृष्ण टॉकीज जवळ त्यांना प्रवीण महाजन दिसला. त्यावरून त्यांच्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी प्रवीण याने त्याच्याकडील चाकूने सय्यद यांच्यावर वर केला आणि तो तिथून पळ काढत असताना तेथील नागरिकांनी प्रवीण याला पकडले. In Pune a goon named Pravin Mahajan killed a policeman

वार गळ्यावर लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी सय्यद यांना केइएम KEM हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गळ्यावर वार झाला असल्याने, त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रवीण महाजन याला अटक केली आहे.

Edited By- Digambar jadhav 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com