रिक्षा अनुदानात पुणे अव्वल

रिक्षा अनुदानात पुणे अव्वल
Saam Banner Template (43).jpg

पुणे - अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रिक्षाचालकांना Auto राज्यसरकारच्या वतीने देण्यात येणारे अनुदान प्राप्त होत आहे, विशेष म्हणजे पुणे Pune आणि पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad आरटीओ RTO प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत, वैध अर्जदारांना निधी वितरित केले, या प्रक्रियेमध्ये झीरो पेंडन्सी असणारी राज्यातील ही दोनच कार्यालये आहेत. Pune tops in rickshaw subsidy

रिक्षा चालकांसाठी जाहीर केलेल्या अनुदानासाठी प्राप्त अर्जांवर पुणे आरटीओने २८ हजार ७६० आणि पिंपरी चिंचवड आरटीओ १९ हजार ७९३ अर्ज निकाली काढले आहेत. कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांसाठी राज्य सरकारने दीड हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. या अंतर्गत अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी करण्यात आली, वैध अर्जदारांना तात्काळ पैसे पाठवले जातात. 

हे देखील पहा -

तर, अर्जात त्रुटी असलेल्यांना पुन्हा अर्ज करायला सांगितला जात आहे.  पुण्यात २८ हजार ७६० अर्ज प्राप्त झाले. ते सर्व निकाली काढण्यात आले आहेत. तसेच, यातील बहुतांशी सर्वांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत, दरम्यान अनुदानाची रक्कम तुटपुंजी असून सरकारने याचा विचार करावा अशी मागणी रिक्षाचालक  करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com