राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर राहूल  गांधी म्हणतात...

राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर राहूल  गांधी म्हणतात...


नवी दिल्ली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. मात्र ही राणेंची वैयक्तिक मागणी असल्याचे भाजपाने स्पष्ट केले होते. त्यावरून राहुल गांधी यांनी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, ‘’प्रश्न विचारल्यामुळे सरकारलाही फायदा होतो. मात्र राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे आहे.’’राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा देत आहोत. मात्र निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. आम्ही पंजाब, छ्त्तीसगड आणि राजस्थानमध्ये निर्णय घेण्याचा स्थितीत आहोत, असे ते म्हणाले होते.


दररोज हजारांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहेत. त्यातच कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीह होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या विरोधकांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्ला चढवला आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
लोकसंख्येची घनता जेवढी जास्त, तेवढाच कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. मुंबई आणि दिल्लीत त्यामुळेच कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात सापडत आहेत. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळाली पाहिजे. आम्ही केंद्र सरकारला सल्ला देऊ शकते. मात्र सरकारला काय करायचे आहे, ते त्यांनाच ठरवायचे आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले होते.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट झाली आहे. 
 

WebTittle :: Rahul Gandhi says on the demand of President Rajavati ...

 

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com