राज्यात पावसाच्या सरी,मराठवाड्यात पावसाचा अंदाज

राज्यात पावसाच्या सरी,मराठवाड्यात पावसाचा अंदाज

परभणी - मराठवाड्यात चार दिवसापांसून अधूनमधून पाऊस होत असून पुढील पाच दिवस अशीच स्थिती राहील. २५ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. विशेषत: लातूर जिल्ह्याच्या काही भागात उद्या (ता. २१) मध्यम ते भारी स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा विभागाने वर्तवला आहे.

मुंबई - सातत्याने पडणाऱ्या पावसाने शुक्रवारीही हजेरी लावली. हिंदमाता उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. हे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाइन स्वच्छ करण्याचे काम भरपावसात कर्मचारी करीत होते.


पुणे - कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २०) दिवसभर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मध्य महाराष्ट्रातही पुणे, नगर, उत्तर दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी विदर्भातील वेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद, अकोला, नागपूर येथे हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. 

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. त्यामुळे अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत चिपळून येथे सर्वाधिक १०१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोकणातील कुलाबा, लांजा, वाडा, रामेश्वर, पालघर, विक्रमगड येथेही जोरदार पाऊस पडला. तर अनेक भागांत हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत होत्या. तसेच घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडला.

नगरमधील अकोले येथे सर्वाधिक ८८ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यातील पैठण येथे सर्वाधिक ७२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.


Web Title: Rain in Maharashtra Monsoon

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com