वाळू माफीयांना पावसाचा दणका; 30 हायवा अडकले नदीपात्रात
valu

वाळू माफीयांना पावसाचा दणका; 30 हायवा अडकले नदीपात्रात

रात्रीचा वैध आणि अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना पावसाच्या वाढलेल्या पाण्याने चांगलाच दणका दिला आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील सासखेडा आणि बुलडाणा जिल्ह्यातील सावरगाव तेलीगावासह, वाघाळा येथील पूर्णा नदीपात्रात वाळू माफियांचे तब्बल ३० टिप्पर नदीपात्रात अडकले आहेत. काल रात्री उशिरा ही घटना घडली असली तरी अजूनही नदीपात्रातील पाणी कमी झालं नसल्याने हे सर्व टिप्पर नदीपात्रातच अडकून आहे. हे टिप्पर बाहेर काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर काही सात ते आठ टिप्पर चाक ही यात अडकले होते मात्र त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. (The rains hit the sand mafias)

मंठा तालुक्यातील सासखेडा  येथे अंदाजे ६ आणि येथुन जवळच असलेल्या बुलढाण्यातील सावरगाव तेली येथे १६ हायवा नदीपात्रात अडकून पडले आहेत. या पैकी काही ठिकाणाहून वाळू उपशाला परवानगी असून काही ठिकाणी नाही. मात्र पूर्णा नदीपात्रातून काही ठिकाणाहुन वाळू उपशाला परवानगी नसताना देखील वाळू माफिया पूर्णा नदीपात्रातील वाळू रात्रीची उपसून नदीकाठी आणून त्याची साठवणूक करून ठेवतात. नंतर दिवसभर ती वाळू विकली जाते.

हे देखील पाहा

काल रात्री या टिप्परमध्ये वाळू भरली असताना अचानक नदीपात्रात पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे सर्व टिप्परच्या चालकांनी टिप्पर नदीतच उभे ठेवून नदीबाहेर पळ काढला परिणामी हे सर्व ३० टिप्पर नदीपात्रात अडकले. आज दिवसभरात यातील काही टिप्पर बाहेर काढण्यात यश आल असून काही टिप्पर नदी बाहेर काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com