मनसेच्या दिवाळी कार्यक्रमाला राज ठाकरेच अनुपस्थित

मनसेच्या दिवाळी कार्यक्रमाला राज ठाकरेच अनुपस्थित

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या दीपोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. कृष्णकुंजच्या दारात आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवाकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र पाठ फिरवली. यामुळे मनसैनिकांचा हिरमोड झाला असून राजकीय चर्चांनादेखील उधाण आले आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या पाच वर्षांपासून शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. राज ठाकरे दर वर्षी या दीपोत्सवाला हजर असतात. या वेळी मात्र राज ठाकरेंनी दीपोत्सवाला दांडी मारली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी 150 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत जोरदार प्रचार केला; मात्र मनसेला केवळ एकाच जागेवर यश मिळवता आले.

यामुळे राज ठाकरे नाराज असल्याचे दिसून येते. या वेळी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी पत्नीसह हजेरी लावली. राज ठाकरेंना खांदादुखीचा त्रास होत असल्याने ते येऊ शकले नाहीत. ते पुढील काही दिवसात भेट देणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. 

हिरकणी टीमची उपस्थिती 

शिवाजी पार्कातील दीपोत्सवाला यंदा हिरकणीच्या टीमने हजेरी लावली. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होत्या. मागील वर्षी या दीपोत्सवाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आशा भोसले यांनी हजेरी लावली होती. दरम्यान या वेळी हिरकणीच्या संपूर्ण टीमने मनसेमुळेच हिरकणीला आता सर्व ठिकाणी सिनेमागृह मिळाल्याचे सांगत मनसेचे आभार मानले. 

Web Title: Raj Thackeray absents for MNS Deepotswa

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com