कोरोनाचा वाढता कहर त्यात लसींचा तुटवडा याबद्दल आरोग्यमंञी राजेश टोपे काय म्हणतात... ( पहा व्हिडीओ)

कोरोनाचा वाढता कहर त्यात लसींचा तुटवडा याबद्दल आरोग्यमंञी राजेश टोपे काय म्हणतात... ( पहा व्हिडीओ)
Rajesh tope news

मुंबई:  राज्यात कोरोनाचा Corona संसर्ग वाढत आहे. तेवढाच लसीचा Vaccine तुटवडा सुद्धा जाणवत आहे. मात्र राज्याची ही नेमकी स्थिती का होत आहे, आणि त्यातही लसीचा पुरवठा  जास्त प्रमाणात कसा होऊ शकतो आणि कसा वाढवला जाऊ शकतो याविषयी राजेश टोपे Rajesh Tope स्पष्टपणे बोलले आहेत. Rajesh Tope speak on Coronas growing havoc with a shortage of vaccines

राज्यात सध्या लसीची स्थिती काय आहे, संसर्ग अधिक प्रमाणात वाढत आहे, आणि लस नेमकी कधी येणार आहे ?

याबाबत राजेश टोपे म्हणाले, लसीकरण या बाबतीत दोन विषय आहेत. एक म्हणजे ४५ वर्षाच्या पुढील वयोगटासाठी लसीकरण कार्यक्रम जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आणि दुसरा जो आता राज्य शासनावर सोपवलेला आहे, तो म्हणजे १८ ते ४४ वयोगटातल्या लसीचा कार्यक्रम. ४५ वयोगटातील यावर आधिकार पूर्ण केंद्र सरकारचा आहे. हा कार्यक्रम पूर्णतः केंद्र सरकारचा आहे. भारत सरकार आम्हाला लस देईल तेव्हा आम्ही आमच्या ४२०० केंद्रांवर लस पाठवून दररोज आठ लाख लसीकरण करू शकतो. ही कॅपॅसिटी आहे. आणि साडे पाच लाख लसीकरण आम्ही करून पण दाखवले आहेत. जरी लस कमी पाठवले होते तरी आम्ही साडेपाच लाख लसीकरण करून दाखवले आहे. काल राज्यात लसीकरणाची गती कमी होती. कारण काल ४२०० केंद्रावर फक्त पन्नास हजार लसी उपलब्ध होत्या. प्रत्येक केंद्रावर फक्त १० ते १५ लसी असतील म्हणून इतर बरेच लसीकरण केंद्र बंद होते. 

महाराष्ट्राला प्राप्त झालेल्या ९ लाख लसी याबाबत राजेश टोपे म्हणाले,  
महाराष्ट्रात नऊ लाख Nine lakh लसी प्राप्त झाले आहेत. हे नऊ लाख राज्यभराच्या सर्व केंद्रांवर पाठवण्यात येतील. साधारण दररोज दोन ते तीन लाख लसीकरण करण्यात येईल. ४५ वयोगटातील महाराष्ट्रातील लोकांची संख्या एकूण साडेतीन कोटी आहे. त्यापैकी १ कोटी ४५ लाख लोकांचे लसीकरण झालेले आहे. तसेच भारत सरकारच्या सूचनेनुसार एक मे ला लसीकरण सुरू करण्यात आले तेव्हा लसींचा साठा मुबलक प्रमाणात नव्हता. 

राज्यात सुरु असलेला रेमेडिसिवीर चा काळाबाजार याबाबत टोपे म्हणाले, 
रेमेडिसिवीर इंजेक्शनचा Remedisivir काळाबाजार हा रोखलाच गेला पाहिजे. फूड अँड ड्रग्स अथोरिटी FDA जवळचे फुड इंस्पेक्टर असतात त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. जे काही राज्याच्या वाट्याला येते ते प्रत्येक जिल्ह्याच्या ऍक्टिव्ह केसेस प्रमाणे वाटप केले जातात. आणि त्याच्यावर पूर्ण नियंत्रण हे त्या जिल्ह्याच्या कलेक्टर चा आहे. अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि कुठे काळाबाजार झाल्याचे निदर्शनास आले तर अतिशय कडक कारवाई करण्याचे अधिकार कलेक्टरला दिलेले आहेत. 

राज्यातील लसीची किंमत याविषयी राजेश टोपे सांगतात, 
किंमत किती आहे ती किंमत सुद्धा केंद्र शासनाने त्यांच्या प्रत्येक कंपनीची वेगवेगळी ठेवली आहे. कंपनीचे पेटंट  गिलिऍड नावाच्या कंपनीचे आहे. आणि सात कंपन्या त्याचे उत्पादन करीत आहे. या सातही ही कंपन्यांचे रेट्स वेगवेगळे आहेत. राज्य शासनाची अपेक्षा होती की या सातही कंपन्यांचे रेट समान असावेत.  कमी असावेत.  केंद्र सरकारने लसीच्या किमती मान्य केले असल्यामुळे राज्य सरकारलाही त्या केंद्राप्रमाणेच काम करावे लागते. Rajesh Tope speak on Coronas growing havoc with a shortage of vaccines
 
एकूणच राज्यातील कोरोनाची ची स्थिती लक्षात घेता, लसींचा पुरवठा केंद्राकडून अधिक प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे रेमेडिसिवीर चा तुटवडा Shortage आहे. असे असताना त्याचे दर रेट देखील केंद्राने निश्चित करावेत अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com