शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखानदाराला का उमेदवारी दिली? शेट्टींचा सवाल

शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखानदाराला का उमेदवारी दिली? शेट्टींचा सवाल
Raju Shetty

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची भूमिका मान्य नसल्याने पंढरपूरच्या (Pandharpur) पोट निवडणूक स्वाभीमानी शेतकरी संघटना लढवत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची एफ आर पी (FRP) आणि 100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावे, अशी मागणी करत सरकारच्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा  माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. Raju Shetty Unhappy on Mavikas Aghadi over Candidature of NCP Leader

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार समोरील अडचणीत वाढ झालेली आहे.  यावेळेस खुद्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आपला उमेदवार विजयी करण्यासाठी मतदारसंघांमध्ये तळ ठोकलेला आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आमच्या मागण्यांचा विचार करण्याबाबत बोलतात, आधी शेतकऱ्यांची एफ आर पी द्या आणि घरगुती वीज बिल माफ करा, हीच आमची मागणी असल्याचे उत्तर त्यांनी जयंत पाटील यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना आम्हाला विचारात घेतले होते का, असा प्रश्न शेट्टी यांनी राष्ट्रवादीला विचारला आहे.  Raju Shetty Unhappy on Mavikas Aghadi over Candidature of NCP Leader

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मधील दोन उमेदवार साखर कारखानदार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे आहेत. पण शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com