रणजित डिसले गुरुजी जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती... (पहा व्हिडीओ)
Ranjit Disley Appointed as World Bank Education Advisor

रणजित डिसले गुरुजी जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती... (पहा व्हिडीओ)

सोलापूर : सोलापूर Solapur जिल्ह्यातील बार्शी Barshi येथील ग्लोबल टीचर पुरस्कार Global Teacher Award मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले Ranjit Disley गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार World Bank Education Advisor म्हणून नियुक्ती झाली आहे. या अभिमानास्पद मानामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. रणजित डिसले गुरुजींवर सोलापूर जिल्ह्यासह, राज्यभरातून अभिनंदनाचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  Ranjit Disley Appointed as World Bank Education Advisor

डिसले गुरुजींची जून २०२१ ते जून २०२४ अशा तीन वर्षाच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बॅंकेच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. 

जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, एकसूत्रता आणणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.

'ग्लोबल टीचर'म्हणून नावाजलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील Italy सॅमनिटे राज्यातील १० विद्यार्थ्यांना 'कार्लो मझोने-रणजित डिसले स्कॉलरशिप'नावाने ४०० युरोंची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती विद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून पुढील १० वर्षे १०० मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. जगभरातील  १२ व्यक्तींची सल्लागार म्हणून उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निवड केली आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com