विनाकारण रस्त्यावर टवाळखोरी करणाऱ्या 13 टवाळखोरांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह

विनाकारण रस्त्यावर टवाळखोरी करणाऱ्या 13 टवाळखोरांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह
Rapid test comes positive of 13 people who wandering for no reason

धुळे : लॉकडाउनच्या Lockdown दरम्यान प्रशासनाने विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. आवाहन करून देखील प्रशासनाच्या अवाहनाकडे दुर्लक्ष करीत विनाकारण रस्त्यावर टवाळखोरी करणाऱ्यांच्या विरोधामध्ये पोलीस प्रशासनातर्फे रॅपिड टेस्ट Rapid test करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. Rapid test comes positive of 13 people who wandering for no reason

या कारवाईदरम्यान रस्त्यावर विनाकारण टवाळखोरी करताना आढळून येणाऱ्या टवाळखोरांची रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. या कारवाई दरम्यान पॉझिटिव येणाऱ्यांना तात्काळ ॲम्बुलन्स मध्ये बसून कोविडसेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

या कारवाईदरम्यान शहरातील तब्बल 13 जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. या 13 जणांना शहरातील कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांना चांगलीच धास्ती बसली आहे. आणि त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांच्या संख्यामध्ये काही प्रमाणात देखील घट झाल्याचे दिसून येत आहे.

धुळे महानगरपालिकेच्या Dhule Municipal Corporation  आरोग्य विभागातर्फे व धुळे Dhule शहर पोलिस Police ठाण्याच्या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून ही कारवाई सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com