राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ९ हजार ४२९ विद्यार्थ्यांना केलं फेल !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ९ हजार ४२९ विद्यार्थ्यांना केलं फेल !
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University failed 9 thousand 429 students

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने  RTMNU ९ हजार ४२९ विद्यार्थ्यांना दणका दिला आहे. विद्यापीठाने पुन्हा ॲानलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी अमान्य केल्याने, नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी परीक्षेत नागपूर विद्यापीठातील तब्बल ९ हजार ४२९ विद्यार्थी फेल होणार आहेत. Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University failed 9 thousand 429 students

कोरोनामुळे नागपूर विद्यापीठाने सर्व परीक्षा ॲानलाईन घेण्याचा निर्णय घेतला. यानुसार हिवाळी परिक्षेत काही तांत्रिक अडचणी किंवा महत्त्वाच्या कारणास्तव परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ पुन्हा परीक्षा घेते. 

मात्र, पुनःपरीक्षेची मागणी करताना समाधानकारक कारणं न दिलेल्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांनी पुरेसा वेळ मिळून परिक्षा दिली नाही. अशा विद्यार्थांची पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी नागपूर विद्यापीठाने फेटाळून लावली आहे.

हे देखील पहा- 

नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रफुल्ल साबळे यांनी माहिती दिली आहे कि, हिवाळी परीक्षेत पुनःपरीक्षेची मागणी फेटाळल्याने ९ हजार ४२९ विद्यार्थ्यांनी फेल होणार आहेत. पहिल्या फेजमध्ये ३८९५ तर दुसऱ्या फेजमध्ये ५५३४ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी अमान्य केली आहे. 

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com