रवींद्र जाडेजा म्हणतो ‘पुन्हा 90 च्या दशकात'

रवींद्र जाडेजा म्हणतो ‘पुन्हा 90 च्या दशकात'
Saam Banner Template (20).jpg

भारतीय संघ 18 जून पासून होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या World Test Championship अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे. सध्या सर्व भारतीय खेळाडू विलगीकरणात आहे. विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर भारतीय खेळाडू २ जूनला लंडनला Londan रवाना होणार आहे.  Ravindra Jadeja says Back in the 90s 

मात्र त्यापूर्वी या सामन्यासंबधी एक मोठा खुलासा भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने  केला आहे. रवींद्र जाडेजाने Ravindra Jadeja भारतीय संघ सामन्यात वापरणाऱ्या 90 च्या दशकातील रेट्रो जर्सी स्वेटरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

जाडेजाने या फोटो ला  ‘पुन्हा 90 च्या दशकात #lovingit #india.’ असे कॅप्शन दिले आहे. हे नवीन जर्सी स्वेटर 90 च्या दशकात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडू घालायचे तसे आहेत. ज्यात मध्यस्थानी INDIA असे नाव लिहिले आहे. तर एका बाजूला ICC WTC FINAl 2021 आणि दुसऱ्या बाजूला बीसीसीआयचा लोगो देण्यात आला आहे.

हे रेट्रो जर्सी स्वेटर एमपीएल स्पोर्ट्स या कंपनीने तयार केले आहे. नोव्हेंबर, 2020 पासून ही कंपनी संघासाठी जर्सी स्पॉन्सर करत आहे. याआधी देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी भारतीय संघाने 1992 च्या विश्वचषकातील रेट्रो जर्सी वापरली होती.

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com