वाचा | ... आणि धनंजय मुंडेंच भावनिक आवाहन

वाचा | ... आणि धनंजय मुंडेंच भावनिक आवाहन

करोनाची लागण झालेले मुंडे हे ठाकरे सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हेही करोना पॉझिटिव्ह आले होते. त्या दोघांनीही करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. धनंजय मुंडेही लवकरच बरे होतील. ते फायटर आहेत', असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

करोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झाल्यानंतर धनंजय मुंडे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. त्यामुळंच मुंडे यांना बरं वाटावं म्हणून कार्यकर्ते देवाकडं नवस करीत आहेत. काही जण उपवास करीत आहेत. धनंजय मुंडे यांनं दीर्घायुष्य लाभावं यासाठी औरंगाबादमधील त्यांच्या एका निस्सीम चाहत्यांना भगवानगडावर जाऊन भगवान बाबांना साकडं घालण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी तो हाती मशाल घेऊन धावत भगवान गडावर जाणार आहे. रोज ५० किलोमीटर धावण्याचं लक्ष्य त्यानं ठेवलं आहे.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. 'मित्रांनो, मी बरा आहे. काळजी करू नका. कोणी कसलाही त्रास करून घेऊ नका. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळं अन्नत्याग, पायपीट, नवस असे स्वतःला इजा करणारे कृत्य करू नका ही कळकळीची विनंती. तुम्हाला होणारा त्रास हा मला वेदना देणारा आहे,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com