कसे असतील १५ जून पर्यंतचे निर्बंध ? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

कसे असतील १५ जून पर्यंतचे निर्बंध ? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
lockdown news

प्रश्न १: कोविड Covid निर्बंधांसाठी प्रशासकीय घटक  क, ड किंवा ई यापैकी कोणत्या श्रेणीत असावे हे कोण ठरवते?
 

उत्तर:- हे निर्णय जिल्हा व्यवस्थापन प्रशासन District Management Administration घेते आणि त्याची तात्काळ घोषणा करते. यानंतर वेगवेगळ्या प्रशासकीय घटकांसाठी आवश्यकतेनुसार सदर मापदंड Criteria ठरवले जातात. Read the answers to all the questions in your mind

प्रश्न २- महानगरपालिका क्षेत्रात  ऑक्सिजन बेडची संख्या   किंवा  पॉझिटिव्हिटी दर याच्यात बदल होत असेल तर?
 

उत्तर:- सदर मार्गदर्शक तत्वे २९  मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या आदेशांसाठी लागू असणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन ऑक्सिडेशन बेड आणि पॉझिटिव्हिटी दर याचा साप्ताहिक आढावा  शुक्रवारी  घेणार आहे.  जेणेकरून येणाऱ्या सोमवार पासून  बदल करून त्यांची अंमलबजावणी लवकरच होऊ शकेल.पॉझिटिव्हिटी दर बदलून जिथे  निर्बंधांना शिथील करावे लागणार असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन सदर तरतूद ही ३० मे २०२१ रोजी दिलेल्या ‘ब्रेक द चेन' आदेशाच्या अधीन राहून लागू करू शकते. परंतु त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून परवानगी घ्यावी लागणार आहे. जर पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सीजन बेडची टक्केवारी बदलत असेल किंवा तिथे निर्बंध जास्त कडक करण्याची आवश्यकता भासत असेल, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एसडीएमएला या संबंधी माहिती देऊन निर्बंध आणखी कठोर करू शकते.

हे देखील पहा -

प्रश्न ३:- ऑक्सीजन बेडची टक्केवारी काढताना व्हेंटिलेटर बेड किंवा आय सी यु बेड यांची संख्या ही त्यात अंतर्भूत असेल का?
 

उत्तर:- वैद्यकीय सुविधा किंवा हॉस्पिटल या  ठिकाणी कोणतेही बेड ज्याच्याशी ऑक्सिजन पुरवठा संलग्न असेल किंवा त्याची तरतूद असेल, त्यांना ऑक्सिजन बेड म्हणून गणले जाणार आहे.

प्रश्न ४:- ३०  मे २०२१रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात समाविष्ट नसलेल्या स्पा,सलून, जिम व इतर आस्थापनांबाबत काय?                                                                       

उत्तर:- १२ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या ‘ब्रेक दि चेन’ हा आदेश अशा ठिकाणी अंमलात असणार आहे.

प्रश्न ५:- जिल्ह्याबाहेरील किंवा राज्य बाहेरील नागरिक जर एखाद्या जिल्ह्यातील ऑक्सीजन बेडवर असल्यास त्या ऑक्सिजन बेडला ‘भरलेला’ म्हणून गृहीत धरावे का?
 

उत्तर:- सर्व ऑक्सिजन बेड मग त्यावर कोणत्याही व्यक्ती असो, त्यांना ‘भरलेले ऑक्सीजन बेड म्हणूनच गणले जाणार.

प्रश्न ६:- जीएमएटी, टीओईएफएल,जीआरई,आयईएलटीएस परीक्षांचे काय होणार?

उत्तर:- कोणत्याही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ये-जा करताना त्यांच्यासोबत एका व्यक्तीस परवानगी देण्यात येणार आहे.हॉल तिकीट किंवा इतर कोणतेही दस्तावेज  विद्यार्थ्यांना  प्रवासासाठी वैद्य गृहीत धरण्यात येणार आहे. Read the answers to all the questions in your mind

प्रश्न ७:- नागरिकांच्या जिल्हाअंतर्गत प्रवासाबद्दल काय होणार ?                         

उत्तर:- सदर प्रवास एखाद्या अशा प्रशासकीय घटकासाठी किंवा घटकातून होत असेल जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह दर आहे आणि ७५  टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, तेथे प्रवास करण्यासाठी परवानगी मिळणार नाही. फक्त कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक आणीबाणीच्या प्रसंगी सेवा देणाऱ्या व्यक्तींना परवानगी देण्यात येणार. तसेच इतर ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांसाठी 12 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या आदेशाप्रमाणे निर्बंध /परवानगीच्या अटी-शर्ती लागू असतील. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. 

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com