वाचा | टॅक्सी बुक करताय? मग हे काम केलं का?

वाचा | टॅक्सी बुक करताय? मग हे काम केलं का?

मुंबई : भारतीय रेल्वेने एक जूनपासून देशभरात विशेष प्रवासी रेल्वे चालवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई विभागात येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांतून आंतरराज्य प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिलेली आहे. यामुळे या गाड्यांतून राज्यांतंर्गत प्रवास करता येणार नाही. खासगी गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या ई-तिकिटांवर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, पाच आसनी वाहनात तीन आणि सात आसनी वाहनात पाच प्रवाशांना परवानगी असेल. स्कूटर, मोटार सायकल, रिक्षा यांमधून प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे परिवहन आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वावरचे नियम पाळून प्रवास करावा. तसेच प्रवासावेळी मास्कचा वापर अनिवार्य असून टॅक्सीत प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन परिवहन आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानक टॅक्सी प्रतिनिधी क्रमांक

मुंबई टॅक्सी संघटना प्रतिनिधी : शाम खानविलकर ८३६९५४५४५७, ८६५५५५१५६२

वांद्रे टर्मिनस : देवाडिगा ९०२९८८५९३८, कोटीयन ७९७७९२७००९

सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, दादर: चंदू नायर ९८२१६४०४९८

लोकमान्य टिळक टर्मिनस: फरीद ७९७७७७४८८४, शशी दुबे ९८३३०८०८००, तुपे ९०८२८८८३८०


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस या स्थानकांवर टॅक्सी उपलब्ध राहणार आहे. टॅक्सींच्या माध्यमातून 'घर ते स्थानक' आणि 'स्थानक ते घर' या टप्प्यांसाठी ही टॅक्सी सेवा असणार आहे. टॅक्सीची शोधाशोध टाळण्यासाठी स्थानकावरच मुंबई टॅक्सी मेन्स संघटनेचे प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. ज्या प्रवाशांना टॅक्सी आरक्षित करायची आहे, अशा प्रवाशांनी कॉल करुन अथवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करुन प्रवास करता येईल. शक्यतो प्रवाशांना स्थानकात पोहचण्यापूर्वी किंवा घरातून निघण्यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करावी, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.आजपासून विशेष रेल्वे धावणार असून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला आहे. टॅक्सींसाठी ताटकळत राहणे टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून टॅक्सी आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


WebTittle:: Read | Book a taxi? So did it work?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com