नक्की वाचा | भारतात टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर बंदी

नक्की वाचा | भारतात टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर बंदी


अखेर गुगल प्ले स्टोअर आणि ऍपलच्या एपस्टोअरवरुन चीनी एप हटवण्यात आलेत. 59 चीनी ऍप हटवत भारतानं चीनच्या अर्थकारणावर मोठा घाव घातलाय..टिकटॉक, यूसी ब्राऊसरसह तब्बल 59 चिनी अॅप भारत सरकारनं बॅन केले आहेत...सीमेवर चिनच्या मुजोरीला भारत सरकारनं अतिशय चाणाक्षपणे उत्तर दिलं आहे...या चिनी कंपन्या भारतातून या अॅपद्वारे हजारो कोटी कमावत होत्या..हेच पाहता आता भारत सरकारनं कडक पावलं उचलली आहेत...आणि या कंपन्यांना सीमेबाहेर हाकललं आहे...  यापैकी अनेक कंपन्यांमध्ये १० ते १२ हून अधिक भारतीय काम करतात. त्यामुळे या कंपन्यानी भारतामधून गाशा गुंडळल्यास अंदाजे १० ते १२ हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडण्याचीही शक्यताय.दुसरीकडे सीमावादावर आज पुन्हा भारत आणि चीनमध्ये बैठक होणार आहे. भारत व चीन यांच्या वरिष्ठ लष्करी कमांडरांची तिसरी बैठक आज होणार आहे. याआधी झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सीमेवरील वादग्रस्त ठिकाणी सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली होती. मात्र असं काहीच झालं नाही.. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. 


केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ही कारवाई केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘६९अ’ मधील तरतुदींचा आधार घेत ५९ अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.

लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली.

* अ‍ॅपवर बंदी घातल्यामुळे मोबाइल आणि इंटरनेट वापरणाऱ्या कोटय़वधी भारतीयांच्या हिता

* राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक माहितीच्या गैरवापरातून एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहेत.

वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे  बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.

विशेषत: टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपवरून प्रसारीत केल्या जाणाऱ्या चित्रफिती आणि संवाद यांच्याविषयी अनेकदा वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी या अ‍ॅपवर घातलेल्या बंदीचे स्वागत होत आहे.भारत आणि चीन सैन्यात गलवान खोऱ्यात संघर्ष होण्याच्या आधीपासून म्हणजे देशात करोनाचा फैलाव वाढू लागल्यापासूनच चिनी वस्तूंप्रमाणे चिनी मोबाइल आणि अ‍ॅपवरही बहिष्कार घालण्यासंदर्भात समाजमाध्यमांवरून मोहीम चालवली जात होती. ही अ‍ॅप वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारीही सातत्याने येत होत्या.

Webtittle ::Read exactly | 59 Chinese apps banned in India

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com