नक्की वाचा | उद्यापासून घरोघरी येणार वृत्तपत्र पण.... 

नक्की वाचा | उद्यापासून घरोघरी येणार वृत्तपत्र पण.... 

मुंबई:करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घरोघरी वृत्तपत्र वितरणावर बंदी आणली होती. परंतु, सोसायट्या व त्यामधील रहिवाशांच्या रूपातील वाचकांना वृत्तपत्र घरी हवे आहे. त्यामुळेच वृत्तपत्र वितरणासंबंधी राज्य सरकारच्या ४ जूनच्या सुधारित आदेशाचे 'महासेवा'ने स्वागत केले आहे.
'सध्याचे युग डिजिटल असल्याने अमर्याद माहितीचे आदान-प्रदान होत असते. पण त्यामधील प्रमाणित किंवा खरी माहिती मिळणे आव्हानात्मक आहे. करोना काळही असाचा आव्हानांचा होता. केंद्र व राज्य सरकारच्या लॉकडाउनसंबंधी मोठ्या प्रमाणात खोटी माहिती या काळात सामाजिक माध्यमांवर पसरवली गेली. त्यातून लोकांमध्ये नाहक घबराट निर्माण झाली. नागरिकांना बातम्या व लेखांमार्फत योग्य माहिती मिळणे अत्यावश्यक असते. वृत्तपत्रे हे सरकार व नागरिक यांच्यातील दुवा असते. यामुळेच वृत्तपत्रे ही वाचकांपर्यंत खरी आणि नेमकी माहिती पोहोचविणारे प्रमाणित माध्यम ठरते. या सर्व पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगत ७ जूनपासून घरोघरी वृत्तपत्र वितरीत करण्यात येणार आहे.


मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित वावर या नियमांचे पालन करीत रविवारपासून वृत्तपत्र वितरण सुरू व्हावे. यासंबंधी 'महासेवा' ने मुंबईतील ६० हजार सोसायट्यांना मार्गदर्शक तत्त्वे पाठवली आहेत.घरोघरी वृत्तपत्र वितरण करण्याला राज्य सरकारने ७ जूनपासून परवानगी दिली आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशननेस्वागत केले आहे. या अंतर्गत मुंबई आणि परिसरातील ६० हजार सोसायट्यांना घरोघरी वृत्तपत्र वितरण करण्यासंबंधी 'महासेवा'ने मार्गदर्शक तत्त्वे पाठवली आहेत.

WebTittle : Read exactly | Newspapers will come from house to house from tomorrow but ....


 

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com