नक्की वाचा | ...तर  आता अशी आहे पाचव्या लॉकडाऊनची तयारी

नक्की वाचा | ...तर  आता अशी आहे  पाचव्या  लॉकडाऊनची तयारी

नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देऊन अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. लॉकाडऊनच्या पाचव्या टप्प्यातही ११ शहरांमध्ये नियमांचे कठोर पालन सुरूच राहील. ही ती शहरं आहेत जिथे करोनाचा संसर्ग सतत वाढत आहे.


लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून राजकीय पातळीवर हालचाली घडताना दिसत आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लॉकडाऊनबाबत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपणार आहे. यामुळे लॉकडाऊन वाढणार की संपणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान मोदी रविवारी 'मन की बात'मधून लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा करतील असं सांगण्यात येतंय. पण गृहमंत्रालयाने हे रिपोर्ट फेटाळून लावले आहेत. 

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सुरत आणि कोलकातामध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे सक्ती कायम राहू शकते. या ११ शहरांमध्ये देशातील ७० टक्के करोना रुग्ण आहेत. तर अहमदाबाद, दिल्ली, पुणे, कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. इथे देशातील ६० करोना रुग्ण आहेत.लॉकडाऊनबाबत अमित शहा यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. शहा यांनी त्यांचे मत आणि विचार जाणून घेतले. ३१ मेनंतर लॉकडाऊनबाबत राज्यांची भूमिका काय आहे. त्यांच्या सूचना काय आहेत, हे शहा यांनी समजून घेतलं. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबाबत सरकारचे मंथन सुरू आहे. तर लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला जाणार हे निश्चित आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com