नक्की वाचा | ‘अंतिम’ परीक्षासंदर्भात सामंत यांनी काय केला दावा 

नक्की वाचा | ‘अंतिम’ परीक्षासंदर्भात सामंत यांनी काय केला दावा 


मुंबई : राज्यात परीक्षा न झाल्यामुळे पदवी मिळालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर ‘कोविडबाधित बॅच’ असा शिक्का येणार नसल्याची ग्वाही सामंत यांनी दिली.शासनाची भूमिका विद्यार्थीहिताची आहे, आणखी २ ते ३ दिवस यूजीसीच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊनही ते उत्तीर्ण होत नसतील तर ग्रेस गुण देऊन एटीकेटी मुक्त करण्यात यावे, अशी शिफारस कुलगुरुंनी केली असून त्यावर सरकार विचार करत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

विद्यापीठांच्या परीक्षांवरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागात चांगलीच जुंपली आहे. युजीसीने परीक्षा घेण्याचे फर्मान सोडल्यानंतरही मंत्री सामंत यांची नकारघंटा कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा घेणे योग्य नसल्याचे सामंत यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, अंतिम वर्षासह अन्य परीक्षांबाबत कुलगुरू सूचवतील तो निर्णय घेण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत ठरले होते. त्यानुसार ६ जुलै रोजी कुलगुरुंची बैठक झाली. यात १३ कुलगुरुंनी परीक्षा घेणे योग्य नसल्याचे मत मांडले. त्यानुसार युजीसीला विनंती केली होती. आता कुलगुरुंचे ऐकावे की युजीसीचे? या संभ्रमात आम्ही आहोत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याचा पुनरुच्चार उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला. तसेच राज्यातील १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंनी देखील परीक्षा घेण्याबाबत प्रतिकूल मत व्यक्त केल्याचा दावाही सामंत यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com