वाचा | मोदी सरकारने कसं गाजवलं एक वर्ष 

वाचा | मोदी सरकारने कसं गाजवलं एक वर्ष 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड जनादेश मिळाल्यानंतर पहिला मोठा निर्णय घेतला तो जम्मू काश्मीरमधील कलम ३७० काढण्याचा. या निर्णयामुळे देशाचा नकाशाच सरकारने बदलून टाकला. या निर्णयामुळे मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका सहन करावी लागली, तर अनेक देशांनी जाहीरपणे पाठिंबाही दिला. यामुळे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याची जुनी मागणी पूर्ण झाली.

भाजपने दोन राज्य गमावली असली तरी कर्नाटक आणि मध्य प्रदेशची सत्ता पुन्हा काबिज केली. काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा फायदा दोन्ही ठिकाणी भाजपला झाला. मध्य प्रदेशातही ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने भाजपचा झेंडा हाती घेतला. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहार, पुन्हा पुढच्या वर्षी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्रिमंडळासह ३० मे २०१९ रोजी शपथविधी झाला, त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या गेल्या एक वर्षात भाजपप्रणित एनडीए सरकारने राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेले अनेक निर्णय घेतले. काँग्रेसला सलग दुसऱ्या निवडणुकीत चितपट करत भाजपने प्रचंड बहुमत मिळवलं आणि पुन्हा एकदा सत्ता काबिज केली. मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात हिंदू विचारधारेशी संबंधित अनेक निर्णय घेतले आणि दशकांपासून चालत आलेल्या मागण्या पूर्णत्वास नेल्या. तर लोकप्रिय निर्णय घेऊनही काही राज्यात भाजपला जनतेने नाकारलं. महाराष्ट्रात तर शिवसेनेसारखा पारंपरिक मित्रही गमवावा लागला.


मोदी सरकारने पुन्हा सत्तेत येताच मुस्लीम महिलांवर अन्याय करणारी तीन तलाक प्रथा बंद केली आणि यासाठी कठोर कायदा आणला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हा कायदा मंजूर करुन घेण्यात सरकारला यश मिळालं. तीन सी म्हणजेच Conviction (विश्वास), Courage (धैर्य) आणि Commitment (वचनबद्धता) अशा शब्दात भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षाचं वर्णन केलं.या कार्यकाळात भाजपची मोठी वैचारिक कामगिरी म्हणजे राम मंदिर बांधणीचा मार्ग मोकळा करणे. राम जन्मभूमी अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टाने मोकळा करुन दिला आहे. हे दोन्ही मुद्दे भाजपच्या अजेंड्यात अनेक वर्षांपासून होते. लोकसभा निवडणुकीत भाजपने याच मुद्द्यांवर प्रचारही केला होता.आतापर्यंत भाजपचे चाणक्य असलेले अमित शाह यांनी गृह मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. त्यांनीच कलम ३७०, सीएए यासह इतर मोठ्या निर्णयांचं धोरण निश्चित केलं.

WebTittle :: Read | How the Modi government ruled for a year

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com