वाचा |  मनसेचं सरकारविरोधात  आंदोलन 

वाचा | मनसेचं सरकारविरोधात आंदोलन 

मुंबई: वाहतूक व्यवसाय मेटाकुटीला आला असताना सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. लॉकडाऊन मधून शिथिलता देताना ओला-उबर सारख्या टॅक्सीसेवांना परवानगी देण्यात आली मात्र या व्यवसायातील अन्य घटकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाहतूक क्षेत्राला दिलासा देणारे पाऊल सरकारने उचलावे, अशी आमची अपेक्षा आहे. सरकारने वाहतूक क्षेत्राला तातडीने आर्थिक मदत जाहीर करून सावरायला हवे. या सगळ्या प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वाहतूक सेनेचे संजय नाईक यांनी जाहीर केले.


- वाहतूक क्षेत्राला आर्थिक मदत जाहीर करावी.
- वाहतूक क्षेत्राला दिलासा देणारे धोरण जाहीर करावे
- ओला-उबर प्रमाणे रिक्षा टॅक्सी चालकांना सामान्य प्रवासी वाहतुकीची परवानगी द्यावी

वाहतूक व्यवसायात कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा आवाज राज्य सरकारपर्यंत जावा म्हणून येत्या शुक्रवारी (१२ जून) मनसे वाहतूक सेना अभिनव आंदोलन करणार असून सायंकाळी ५ वाजता १ मिनिटासाठी हॉर्न वाजवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.'वाहतूक व्यवसायातील सर्वांचा आक्रोश बहिऱ्या राज्य सरकारच्या कानावर जावा, झोपेचं सोंग घेतलेलं राज्य सरकार खडबडून जाग व्हावं, यासाठी शुक्रवार १२ जूनला संध्याकाळी ठीक ५ वाजता सर्वांनी फक्त १ मिनिट हॉर्न वाजवायचा आहे. या आंदोलनाद्वारे वाहतूकदारांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवायचा आहे', असे आवाहन नाईक यांनी केले. या आंदोलनासाठी मनसेने #MNSHornOKPlease हा हॅशटॅगही तयार केला असून सोशल मीडियावर आंदोलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.


WebTittle  :Read | MNS will agitate for Thackeray government


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com