वाचा | महाराष्ट्रात करोनाचा नवा उच्चांक

वाचा | महाराष्ट्रात करोनाचा नवा उच्चांक

मुंबई: राज्यात करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारावर गेली आहे. आज दिवसभरात राज्यातील विविध रुग्णालयांतून करोनामुक्त झालेल्या १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ५० हजार ९७८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३ हजार १७ इतकी आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे.देशातील करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात अजूनही करोना संसर्गावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. राज्यात करोनामृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. आज करोनामुळे राज्यात १२० रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचवेळी गेल्या २४ तासांत आणखी ३ हजार ३९० करोना बाधित रुग्णांची भर पडली.

राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. आज मुंबईत दिवसभरात १३९५ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ७९ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले. मुंबईत आता करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८१३५ इतकी झाली असून त्यातील २६९८६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, २८९५९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर २१९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिका आरोग्य विभागाने दिली.राज्यात आज ३ हजार ३९० नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ७ हजार ९५८ इतकी झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण मुंबई , ठाणे आणि पुणे या भागातील आहेत. राज्यात सध्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.२ टक्के इतके असून मृत्यूदर ३.६५ इतका आहे. राज्यात सध्या ५, ८७,५९६ लोक होमक्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात १५३५ संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७७,१८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९,६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com