वाचा | आता पतंजलीनं तयार केलं कोरोनावर औषध

वाचा | आता पतंजलीनं तयार केलं कोरोनावर औषध

सध्या जगभरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत करोनावरील लस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध शोधल्याचा तसंच ते प्रभावीदेखील ठरत असल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला होता. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी हे औषध तयार केलं आहे. तसंच आज लाँचदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण हे वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यातील निकाल सर्वांसमोर ठेवणार आहेत. सध्या या औषधाचं उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत.

पतंजलीला मिळालेल्या परवानगीनंतर या औषधाची वैद्यकीय चाचणी इंदूर आणि जयपूरमध्ये करण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पतंजलीची एक टीम यावर संशोधन करत होती, अशी माहिती बालकृष्ण यांनी दिली. याव्यतिरिक्त अनेक करोनाबाधितांवर या औषधाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तसंच यामध्ये १०० टक्के यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. करोनील हे औषध करोनाबाधितांना ५ ते १४ दिवसांमध्ये बरं करू शकतं असा दावाही बालकृष्ण यांनी केला आहे.


पतंजलीनं तयार केलं करोनावरील आयुर्वेदिक औषध; आज आणणार जगासमोर
देशात आणि जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं करोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला आहे. आज पतंजलीचं करोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध जगासमोर येणार आहे. आचार्य बालकृष्ण हे दुपारी १२ वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

WebTittle :: Read | Now Patanjali has prepared medicine on corona

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com