वाचा | दोन देशांमध्ये वाढला तणाव, नेमकं काय घडलं?

वाचा | दोन देशांमध्ये वाढला तणाव, नेमकं काय घडलं?

६ जूनला भारत आणि चीनमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर चीनच्या बाजूच्या जवानांनी मागे सरकावं असं ठरलं होतं. ते परत आपल्या भागात जाणार होते. पण तसं झालं नाही. चीनच्या लष्करानं भारतीय हद्दीत घुसण्यास सुरूवात केली होती. त्यांनी प्रत्यक्ष ताबारेषा (एलएसी) पार केली होती. त्यामुळे १५ जूनच्या रात्री दोन्ही देशांमध्ये संघर्ष उडाला आणि ज्या सीमेवर गेल्या ४५ वर्षांत एकही गोळी चालली नाही असं म्हणतात, तिथे भारताचे २० जवान शहीद झाले आणि मुजोरी दाखवणाऱ्या चीनला भारतानेही जबर उत्तर दिले. चीनचे ४३ जवान ठार झाले.

भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, प्रत्यक्ष ताबारेषेवर सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात अचानक उसळलेल्या अभूतपूर्व संघर्षांमध्ये चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. भारताचेही २० जवान शहीद झाले. यात भारताच्या कर्नल हुद्द्याच्या लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे.


१५ जूनच्या रात्री घडलेल्या या प्रकारानंतर १६ जून रोजी सकाळी तीन भारतीय सैनिक शहीद झाल्याची सुरूवातीला बातमी आली होती. त्यानंतर रात्री २० भारतीय जवानांना वीरमरण आल्याचं वृत्त आले. पण, दुसऱ्या बाजूला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिल्याचेही दिसून आले आहे. मध्यरात्रीच्या या संघर्षात चीनचे ४३ सैनिक ठार झाले.

 चीनचे सैनिक मागे जायला तयार नव्हते. उलट परिस्थिती कशी चिघळेल यावर त्यांचा भर होता. त्यावेळी तिथे चीनचे सैनिक भारतापेक्षा संख्येने तिप्पट होते. कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्यासोबत चर्चेसाठी आलेल्या टीमवर चीनच्या सैनिकांनी हल्लाबोल केला. लाठ्या-काठ्या-दगडं आणि फेन्सिंगच्या तारा गुंडाळलेल्या रॉडनी चीनच्या सैनिकांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला.भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकही गोळी या दरम्यान चालली नाही. पण दगड आणि रॉडमुळे भारतीय सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यानंतर भारतीय सैन्यानेही प्रतिहल्ला केला. त्यात चीनचे अनेक सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. तब्बल तीन तास ही झटापट आणि मारामारी सुरू होती.इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या पीएलए म्हणजेच चीनच्या सैनिकांनी माघार घेतल्याचे दिसले नसल्याने १६ बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू यांच्या टीमने चीनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायचे ठरवले. जे ६ जून रोजी ठरले त्याचे पानल करा, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

WebTittle :: Read | Rising tensions between the two countries, what exactly happened?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com