वाचा I मोदी-ठाकरेंमध्ये कश्यावर चर्चा

वाचा I मोदी-ठाकरेंमध्ये कश्यावर चर्चा


करोनामुळे ज्या राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा राज्यांचे मुख्यमंत्री आजच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंतप्रधान मोदी मुंबई, पुणे, नागपूरसह उर्वरित भागातील करोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करू शकतात. विशेषतः देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतील परिस्थिती सुधारण्यासाठी मोदी काही सूचना मुख्यमंत्र्यांना करू शकतात. त्याचबरोबर सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती घेऊ शकतात. दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे.करोनाचा उद्रेक झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वेळा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला होता. आज होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रासह तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर,तेलंगणा, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.


“आपल्या एका गोष्टींची काळजी घ्यायची आहे की, करोनाला जितकं रोखता येईल, त्याचा प्रसार जितका रोखता येईल, तितकीच आपली अर्थव्यवस्था खुली होत जाईल. कार्यालय उघडतील. बाजारपेठा खुल्या होतील. वाहतुकीची साधन सुरू होतील आणि तितक्याच रोजगाराच्या नव्या संधी आपल्यासाठी निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी नवे पर्याय खुले होतील. त्यांचं उत्पन्न वाढेल व साठवण करण्याच्या सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांचं जे नुकसान होत होतं, तेही आपण कमी करू शकू,” असं आवाहन मोदी यांनी केलं होतं.


करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. त्यानंतर अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी लॉकडाउन हळूहळू शिथील केला जात असून, अनलॉक १ जाहीर करून दोन आठवडे लोटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी व पुढील योजना ठरवण्यासंदर्भात राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहे. दोन टप्प्यात ही बैठक असून, पहिल्या दिवशी २१ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज (१७ जून) महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करणार आहेत.

Read what Modi-Thackeray discussed
 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com