वाचा ! कोरोनाच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर 

वाचा ! कोरोनाच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर 

नवी दिल्लीः  देशभरात सोमवारी करोनाचे सर्वाधिक ५२४२ इतके नवे रुग्ण आढळून आले. अनेक राज्यांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. यामुळे देशात करोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत भारतातील करोना रुग्णांची संख्या ही १००१६१ इतकी झालीय. ३११४ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.  देशातील करोना रुग्णांची संख्या सोमवारी सकाळी ९६,१६९ इतकी होती. त्यात ३०२९ जणांचा मृत्यू तर ३६८२४ जण करोनामुक्त झाले होते. तर ५६३१६ जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं.  

 रशियात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असले तरी इतर देशांच्या तुलनेत तेथील मृत्यूदर हा अतिशय कमी आहे. यात तिसऱ्या क्रमांकावर आहे स्पेन. स्पेनमध्ये २७७७१९ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २७६५० जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रिटनमध्ये २४६४०६ इतके रुग्ण आहेत. तर पाचव्या क्रमांकावर ब्राझील, सहाव्या क्रमांकावर इटली, फ्रान्स सातव्या क्रमांकावर, जर्मनी आठव्या, तुर्की नवव्या तर इराण दहाव्या क्रमांकावर आहे.
जगातील करोना रुग्णांची संख्या ५० लाखांजवळ पोहोचली आहे. यापैकी ३१७७९२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

उत्तर प्रदेश आणि तेलंगणने ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याचं जाहीर केलं. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला. त्यापूर्वीच महाराष्ट्र, पंजाब या राज्यांनी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला होता. केंद्र सरकारने रविवारी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. तसंच नवी नियमावलीही जाहीर केली. 

जगात सर्वाधिक करोना रुग्ण हे अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील १५ लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ९१ हजार नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. तिथे २ लाख ९० हजार करोनाचे रुग्ण आहे. त्यापैकी २७२२ जणांचा मृत्यू झाला आहे. भारताने करोना रुग्णांचा १ लाखाचा आकडा ओलांडला आहे. सर्वाधिक करोना रुग्ण आढळणाऱ्या देशांच्या यादीत भारत ११ व्या क्रमांकावर आहे.
 रशियात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असले तरी इतर देशांच्या तुलनेत तेथील मृत्यूदर हा अतिशय कमी आहे. यात तिसऱ्या क्रमांकावर आहे स्पेन. स्पेनमध्ये २७७७१९ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २७६५० जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रिटनमध्ये २४६४०६ इतके रुग्ण आहेत. तर पाचव्या क्रमांकावर ब्राझील, सहाव्या क्रमांकावर इटली, फ्रान्स सातव्या क्रमांकावर, जर्मनी आठव्या, तुर्की नवव्या तर इराण दहाव्या क्रमांकावर आहे.
जगातील करोना रुग्णांची संख्या ५० लाखांजवळ पोहोचली आहे. यापैकी ३१७७९२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

WebTittle :: Read on! What is the position of India in the list of corona?

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com