वाचा | लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार 'या' सेवा 

वाचा | लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार 'या' सेवा 

मुंबई: राज्य सरकारने आदेश दिल्यास कुठल्याही क्षणी सेवा सुरू करण्यास तयार असल्याचे एमएमआरडीए, तसेच मेट्रो १ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. सध्या स्टीकर्स लावण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना कुठे बसावे/बसू नये हे कळणार आहे. तसेच ट्रेनमध्ये चढताना वा उतरताना सुरक्षित वावर राखण्यासाठी ठराविक जागा चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. मोनो किंवा काही दिवसांपूर्वीच सिग्नल यंत्रणा व सर्व तांत्रिक उपकरणांची देखभालदुरुस्ती करण्यात आली आहे. त्याचसोबत मेट्रो, मोनोरेल स्थानकांच्या स्वच्छतेचे, निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही सेवांमधून जवळपास साडेपाच लाख नागरिक नियमित प्रवास करतात.मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम आदेश मिळालेला नाही. 


करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यांहून अधिक काळ मुंबईतील लोकल, मोनो, मेट्रो आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. मात्र, संचारबंदीत शिथिलता आणल्यानंतर लवकरच या सेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानुसार मेट्रो, तसेच मोनोरेल प्रशासनाने करोनापश्चात सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना सुरक्षित वावराचे नियम पाळता यावेत यासाठी स्थानकांत तसेच प्रवासी डब्यांमध्ये स्टीकर्सच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये साधारण दीड मीटर अंतर राहील, अशा जागा तयार करण्यात येत आहेत.

WebTittle :: Read | 'Ya' service will be launched for passengers soon

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com