खुशखबर: एमएसएफमध्ये होणार आठ हजार जवानांची भरती 

खुशखबर: एमएसएफमध्ये होणार आठ हजार जवानांची भरती 

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने (एमएसएफ) अल्पावधीत दहा हजार जवानांना रोजगार दिला. कामाचा दर्जा, इतर सुरक्षा एजन्सीच्या तुलनेत जास्तीच्या असलेल्या अधिकारांमुळे एमएसएफची मागणी वाढत आहे. सध्या राज्यात न्यायालये, शासकीय रुग्णालये, मेट्रो आदी संस्थांत 197 ठिकाणी सुरक्षा पुरवली जात आहे. त्यामुळे जानेवारीत आठ हजार जवानांची मुंबईत भरती होणार असल्याची माहिती महामंडळाचे उपमहानिरीक्षक जय जाधव यांनी दिली. 

घाटीत एमएसएफ सुरक्षा पुरवते. एमएसएफचे सहसंचालक नरेंद्र मेघराजानी यांच्या कामकाजाबद्दल घाटीच्या अधिष्ठातांसह डॉक्‍टरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यासंदर्भात जय जाधव यांनी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांची भेट घेतली. यावेळी नरेंद्र मेघराजानी मात्र केबिनबाहेर बसले होते.  दरम्यान, जय जाधव यांनी पत्रकारांशी सवाद साधला. ते म्हणाले, पोलिसांप्रमाणे इतर यंत्रणा असावी, यादृष्टीने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तयार झाले. खासगी सुरक्षारक्षकांना मर्यादा येतात. मात्र, महामंडळाच्या जवानांना सुव्यवस्थेत अडथळा आणणाऱ्यांना ताब्यात घेण्याची, त्यांच्याविरुद्ध फिर्याद देण्याची मुभा आहे. शिवाय त्यांना शस्त्र बाळगण्याची आणि वेळप्रसंगी त्याचा वापरही करता येतो. डॉक्‍टरांच्या सुरक्षेसह रुग्णालयात सुरक्षित वातावरण निर्मितीत जवानांचे योगदान मिळत आहे. 

 घाटीत आता अधिकाऱ्यांबद्दल अडचण येणार नसल्याचेही स्पष्ट करत नव्याने एसएसओ म्हणूून नूर मोहम्मद शेख यांची नियुक्ती केल्याचे सांगितले. तर पुन्हा त्रास झाल्यास पुन्हा तक्रार करेन, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या. एमएसएफच्या कामात पन्नास टक्के सुधारणा झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

दहा हजार जवानांना खासगी सुरक्षा यंत्रणांपेक्षा चांगला पगार दिला जातो. शिवाय आठ तासांची ड्युटी व इतर सर्व साहित्य, सुविधा दिल्या जातात. त्यांचा पगार दर महिन्याला सात तारखेस होणे अपेक्षित आहे. मात्र, आम्ही ज्यांना सुरक्षा पुरवतो त्यांची बिले लवकर मिळत नाहीत. राज्यात दहा कोटींची थकबाकी आहे. गेल्या फेब्रुवारीपासून सर्वच शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयांकडे थकबाकी आहे. तरी महामंडळाकडून वेळेत पगार करण्याचा प्रयत्न असल्याचे जय जाधव म्हणाले. 


Web Title: MSF employee recruitment

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com