संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती
alandi

आळंदी : आज सर्वत्र शिवराज्याभिषेक Shivrajyabhishek सोहळा साजरा होत असताना संतश्रेष्ठ Saint ज्ञानेश्वर Dnyaneshwar माऊलींच्या Mauli संजीवन समाधी मंदिरात अपरा एकादशीच्या निमित्ताने विविध रंगाच्या फुलमाळांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. Replica of Shivrajyabhishek ceremony in Sanjeevan Samadhi temple of Saint Dnyaneshwar Mauli

आज पहाटेची पवमान आरती, दुग्धाभिषेक झाल्यानंतर मंदिराला विविध रंगाच्या फुलमाळांची सजावट करुन रायगडाची प्रतिकृती साकारुन छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्या साकारण्यात आला.

मागील वर्षभरापासून कोरोनाच्या Corona पार्श्वभुमीवर संत ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र माऊलींच्या मंदिरात विविध सण, उत्सव, कार्यक्रमांची प्रतिकृती अगदी नित्यनियमाने साकारण्यात येत आहे. 

हे देखील पहा -

छत्रपती शिवाजी महाराजांचा Shivaji Maharaj शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर उत्साहात साजरा होत असताना माऊलींच्या मदिरातही या सोहळ्याची प्रतिकृती आळंदी देवस्थानकडुन साकारण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com