'पीएमसी'च्या ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक!

'पीएमसी'च्या ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक!

नवी दिल्ली : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांसाठी सोमवारी (ता.30) रिजर्व्ह बँकेने टोल फ्री क्रमांक सुरू केला.

ग्राहकांना त्यांच्या तक्रारी 1800223993 या क्रमांकावर नोंदवता येतील. त्याचबरोबर www.pmcbank.com या संकेतस्थळावर ग्राहक तक्रार करू शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे. त्याशिवाय पीएमसी बँकेचे संचालक मंडळ रिजर्व्ह बँकेने बरखास्त केले आहे.

आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी (ता.24 सप्टेंबर) पासून सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले. रिझर्व्ह बँकेने बँकेवर "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतल्यामुळे यापुढे बँकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारणे अशा कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नाही. तसेच या बँकेच्या खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पीएमसी बँकेला आरबीआयच्या कलम 35-ए अंतर्गत नियमक बंधनात आल्याने सर्व खाते धारकांचे आर्थिक व्यवहार 24 सप्टेंबरपासून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त एक हजार रुपये दर महिन्यास काढ़ता येणार आहेत.

तसेच ग्राहकांना आता बँकेकडून कर्जदेखील मिळणार नाही. त्यामुळे या बँकमध्ये खाते असणारे नागरिक घाबरले आहेत. बँकेची सेवा पूर्ववत होण्याकरिता किमान सहा महिने इतका कालावधी लागणार आहे, अशी माहिती बँकेचे अधिकारी देत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- अल्प बचत योजनेचे व्याजदर 'जैसे थे'!

- पीएमसी बँक: सामान्य खातेदारांची जबाबदारी कोणाची?

- ... यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पाकने दिले निमंत्रण!


Web Title: Reserve Bank of India launched a toll free number for PMC Bank account holders
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com