सलग पाचव्या महिन्यात घरगुती गॅसच्या दरात वाढ

 सलग पाचव्या महिन्यात घरगुती गॅसच्या दरात वाढ

 नवी दिल्ली: गृहीणींचं बजेट आता कोसळणार आहे, कारण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुतू गॅस सिलिंडरचे दर वाढलेत. गॅस कंपन्यांनी 19 रूपयांनी वाढ केलीय. त्यामुळे आता घरगुती गॅस 749 रुपयांना मिळणार आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 29.50 वाढ करण्यात आल्याने आता सिलिंडर घेण्यासाठी 1325 रुपये मोजावे लागणार आहेत. सिंलिंडरचे नवीन दर आजपासून लागू करण्यात येणार आहे.

ऑक्टोबरला देखील देशातल्या मुख्य शहरातील विनाअनुदानित गॅस सिलिंडर 15 रुपयांनी महागला होता. नवी दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी 605 रुपये मोजावे लागत होते. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर 630 रुपये द्यावे लागत होते. मुंबई, चेन्नईमध्ये 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरचे दर क्रमशः 574.50 आणि 620 रुपये झाले होते. तर 19 किलोग्राम सिलिंडरची दिल्लीतली किंमत 1085 रुपये झाली होती. कोलकात्यात 1139.50 रुपये, मुंबई 1032.50 रुपये आणि चेन्नईमध्ये याच 19 किलोच्या सिलिंडरचे दर 1199 रुपये होती. 

Web Title: domestic lpg gas cylinder price increased by rupees 19 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com