रोहित शर्माने द्विशतक केलं, आणि केले इतके 'विक्रम'

रोहित शर्माने द्विशतक केलं, आणि केले इतके 'विक्रम'

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका. तिसरी कसोटी. दुसरा दिवस. ...आणि हिटमॅनची धमेकादार सेन्च्युरी ! मुंबईकर रोहित शर्मानं पुन्हा एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. हिटमॅन आपल्या कारकिर्दीतल्या सगळ्यात भारी फॉर्ममध्ये सध्या आहे. आणि त्यामुळे दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांना रोहितने सळो की पळो करुन सोडलंय. 

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांचीत सामना सुरु आहे. या सामन्यात सलामीवर रोहित शर्माचा जलवा पाहायला मिळाला. रोहित शर्मानं या सामन्यात नाबाद द्विशतक झळकावलंय. झारखंडच्या रांचीमध्ये सुरू असलेल्या आफ्रिकेविरोधातील या मालिकेत सलामीवाराची भूमिका बजावणारा रोहित शर्मानं 212 धावा ठोकल्यात. गेल्या तीन कसोटी सामन्यातलं रोहितचं हे तिसरं शतक आहे.अवघ्या तीन सामन्यात रोहितनं 500 हून अधिक धावा केल्यात. 

दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात रोहित शर्मानं शतक झळकावलं होतं. रांची कसोटीत तर रोहित शर्मानं द्विशतक झळकावलंय, त्यामुळे या सामन्यातही शर्मा 'रोहिट' ठरलाय.

पहिल्या कसोटीतही रोहित शर्माने दोन्ही डावात शतक केलं होतं. आता या कसोटीतील दुसऱ्या डावातहीरोहित शतक करतो का, याकडे हिटमॅनच्या फॅन्सचे डोळे लागले आहेत.

रोहित शर्माचे धमाकेदार रेकॉर्ड्स - 

1 एका टेस्ट सिरीजमध्ये सर्वाधिक 17 सिक्स

2 सिक्स मारत सेन्च्युरी झळकावली

3 टेस्ट सिरीजमध्ये तिसरी सेन्च्युरी

4 टेस्ट मॅचमध्ये 2000 रन्स पूर्ण

5 ICC चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक सिक्स

6 एका मालिकेत 500हून अधिक धावा

7 सर्वाधिक वेगवान 7000 धावा करण्याचा सेहवाग आणि डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडला

WebTittle: Rohit Sharma doubled, and made so many 'records'.


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com