VIDEO | भाजपची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

VIDEO | भाजपची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

शिवसेनेला काँग्रेस पाठिंब्याचे पत्र देणार नाही, असे भाजपमधील दोन शिर्षस्थ नेते सोमवारी सकाळपासूनच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगत होते. भाजपच्या नेत्यांचा हा आत्मविश्वास खरा ठरला. राज्यातील नेते ज्या आत्मविश्वासाने हे बोलत होते, त्यावरून दिल्लीतील त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी काही संकेत त्यांना दिले होते, हे स्पष्ट आहे. राज्यपालांनी सोमवारी सायंकाळी साडेसातपर्यंत शिवसेनेला १४५ आमदारांच्या पाठिंब्यासह सत्तास्थापनेचा दावा करण्यास सांगितले होते. या घडामोडींवर भाजपच्या नेत्यांचे अत्यंत बारकाईने लक्ष होते. दुपारी वर्षा बंगल्यावर भाजपच्या कोअर समितीची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेने सरकार स्थापन केल्यास विरोधी बाकांवर बसायचे, अशी भूमिका भाजपने घेतली होती. तर काँग्रेसचा पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेना नेते दिल्लीत पोहोचले होते. त्याकडेही भाजपच्या नेत्यांची नजर होती.
एकीकडे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आधारावर सत्तास्थापनेचा दावा दाखल केलेला असताना विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपने सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या हालचालींबाबत 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. पक्षाच्या कोअर समितीची बैठक भाजपने पुढे ढकलली आहे. आता ही बैठक आज, मंगळवारी होणार आहे.


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पत्र दिल्यानंतर शिवसेनेसोबतच्या युतीबाबत निर्णय घेण्याचे भाजपने ठरविले होते. काँग्रेसकडून पाठिंबा मिळाल्याचे पत्र मिळाल्याचा दावा संध्याकाळी शिवसेनेकडून करण्यात येत होता. परंतु प्रत्यक्षात मात्र काँग्रेसकडून पत्र मिळालेले नाही, असा दावा भाजपकडून केला जात होता. शेवटी काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र मिळालेले नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने कोअर समितीची बैठक पुढे ढकलली. भाजपने आता पुढील रणनीती काय हे ठरवण्यासाठी आज बैठक बोलविली आहे.

 The role of BJP's 'weight and watch'

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com