DCGI: रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' लस निर्मितीस मंजुरी; सूत्रांची  माहिती

DCGI: रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' लस निर्मितीस मंजुरी; सूत्रांची  माहिती
sptnik v

सिरम इन्स्टिटयूटला रशियाची लस स्पुटनिक-व्ही बनवण्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती  सूत्रांनी दिलेली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडून मंजुरी ही मंजुरी देण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, आता लसीकरण लढ्याला आता बळकटी मिळणार आहे. देशामध्ये सध्या सिरम इन्स्टिटयूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या प्रमुख लसी आहेत. (Russia's Sputnik vaccine approved- Sources)

देशामध्ये सध्या लसीकरण हव्या त्या वेगात होत नसल्याने लसीकरण लढ्याला बळकटी मिळण्यासाठी परदेशी लसींना मान्यता द्यावी अशी मागणी होत होती. याअगोदर अमेरिकेच्या फायजर लसीला मंजुरी देऊन लोकांना लस द्यायला सुरुवात केली आहे. स्पुटनिक व्ही ९२ टक्के परावी असल्याचे चाचण्यांनामधून समोर आले आहे. त्यामुळे, भारतातील लसींमध्ये आता चौथ्या लसीने उडी घेतली आहे. 

दरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना लसीकरण वेगात होणे गरजेचं आहे. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे देशात तयारी सुरू झाली आहे. परंतु, परदेशातील काही देशांनी १०० टक्के लसीकरण करून कोरोनावरती विजय मिळवला आहे. (Russia's Sputnik vaccine approved- Sources)  

Edited By : Pravin Dhamale  

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com