सचिन वाझेची एक स्पोर्ट्स बाईक दमण मधून जप्त

सचिन वाझेची एक स्पोर्ट्स बाईक दमण मधून जप्त
Sachin Waze's Sports Bike Found by NIA

मुंबई:  मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणात एटीएसला (AST) अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे सापडत आहेत.  सचिन वाझे (Sachin vaze) याची वॉल्व्हो कार (Volvo Car) काही दिवसांपूर्वी थेट दमणमधून (Daman) जप्त केली होती. या कारच्या डिकीत एक बॅग मध्ये जीन्स, पांढरा शर्ट असे सामान मिळाले होते. तर दोन चूर्ण सदृश्य बाटल्या आणि एक सॅनिटायझरचा कॅन सापडले होते.  Wazes sports bikes seized from Daman

तसेच वाझेची एक स्पोर्ट्स बाईक (Sports Bike) काल रात्री दमण मधून जप्त केली आहे. तसेच काल मध्यराञी ही दुचाकी दमनहून NIA  कार्यालयात आणण्यात आणली आहे. ज्या कारखान्यात वल्वो कार जप्त करण्यात आली होती. त्याच पार्टनरकडे ही दुचाकी होती, असे कळते आहे.  दमण येथे सापडलेली ही कार सचिन वाझेच्या पार्टनरची असल्याचं सूत्रांनी सांगितलं होते. एटीएसने दमण येथील एका फॅक्ट्रीत छापा मारला होता. तिथे त्यांना ही कार सापडली. त्याच ठिकाणी ही स्पोर्ट्स बाईक सापडली आहे. या कर आणि बाईकचा कारचा खरा मालक आणि वाझेंच्या दरम्यानच्या कनेक्शनचाही एटीएस शोध घेत आहे.

सचिन वाझेच्या फिसची झाडाझडती घेताना त्याची एक डायरी (Dairy) सापडली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत लिहून ठेवण्यात आली होती. त्यात पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. NIA ने एका सोशल क्लबवर टाकलेल्या छाप्यात हाती लागलेल्या डायरीतून पोलिसांचे (Police) आर्थिक संबध उघड झाले आहेत. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी या डायरी मध्ये आहे. पोलिसांना दिल्या जाणाऱ्या हप्त्यांची माहिती असल्याची सूञांकडून आली आहे. 

वाझेंचे वर्सवा येथील बँक (Bank) शाखेत समाईक खाते होते. वाझेच्या अटकेनंतर संबधित खात्यातून 26 लाख काढण्यात आले. या लॉकरमधून महत्वाची कागदपञे NIA च्या हाती लागली आहेत. या डायरीचा हवाला NIA ने न्यायालयाही दिला होता. या घटनेपूर्वी चहाला येथे वाझेंशी कोणासोबत मिटिंग झाली होती याचा ही शोध NIA  घेत आहे.

Edited by- Sanika Gade.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com