२४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्री बंद; हॉलमार्कशिवाय दागिने विकल्यास तुरूंगवास

२४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्री बंद; हॉलमार्कशिवाय दागिने विकल्यास तुरूंगवास
Gold

पुणे : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केल्यामुळे देशात आजपासून केवळ 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होणार आहे. त्यामुळे आता २४ कॅरेट सोन्याची शुद्धता असलेले दागिने विक्री करता येणार नाहीत. Sale of 24 carat gold jewelery stopped; Imprisonment for selling jewelry without a hallmark

गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय ?

गोल्ड हॉलमार्क Gold Hallmark हे सोन्याच्या शुद्धतेची खात्री करून देणारे एक शासकीय मान्यताप्राप्त मानक आहे. सोने - चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्कचे चिन्ह असते.

कोण देते हे हॉलमार्क आणि शुद्धतेची ग्वाही ? 

एजन्सी ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) अथवा भारतीय मानक ब्युरो हे या हॉलमार्कद्वारे सोन्याच्या शुद्धतेची ग्वाही देते. भारतात जसे BIS आहे तश्याच प्रकारे प्रत्येक देशात हॉलमार्किंगची पद्धत वेगळी आहे. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी या  भारतीय मानक ब्युरोकडून त्यांची तपासणी करून घेणे अनिवार्य असते. शुद्धता आणि प्रत तपासणी केल्यानंतरच त्यावर हॉलमार्क दिला जातो.

कसे ओळखाल 14, 18 आणि 22 कॅरेट सोने ? 

कॅरेट Carat नुसार हॉलमार्क नंबर निश्चित केलेले असतात. जसे कि, 22 कॅरेटसाठी 916 या  क्रमांकाचा संबंधित दागिन्यांवर वापर केलेला असतो. त्याचप्रमाणे 18 कॅरेटसाठी 750 आणि 14 कॅरेटसाठी 585 हा क्रमांक वापरला जातो.

परंतु हेच नंबर का असा प्रश्न आपल्या मनात आला असेल तर तेही जाणून घ्या 

जर दागिन्यावर 585 हा नंबर असेल त्यात 58.5 टक्के शुद्ध सोने वापरलेले असते. जर दागिन्यावर 750 हा नंबर असेल तर त्या दागिन्यांमध्ये 75 टक्के शुद्ध सोने वापरलेले असते आणि जर 916 हा नंबर असेल तर दागिन्यात 91.6 टक्के शुद्ध सोने वापरलेले असते. उर्वरित टक्केवारीमध्ये इतर धातूंचे अलॉय वापरलेले असते जे दागिने बनवण्यासाठी आवश्यक आणि उपयुक्त असतात.

मात्र असे असले तरीही काही सराफा दुकानदार अथवा विक्रेर्ते हॉलमार्कच्या खोट्या चिन्हाचा वापर करतात. त्यामुळे जरी हॉलमार्क असला तरीहि तो खरा आहे की खोटा हे तपासण्यासाठी खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्यूरोचे त्रिकोणी चिन्ह आहे कि नाही याची तपासणी करून घ्यावी. त्यात हॉलमार्किंग सेंटर, सोन्याची शुद्धता तसेच दागिना तयार केल्याचे वर्ष आणि उत्पादकाचे बोधचिन्ह असते.

हे देखील पहा - 

त्यामुळे आजपासून हॉलमार्क शिवाय सोन्याच्या दागिन्यांची विक्री करता येणार नाही. तसेच दागिन्यांवर हॉलमार्क असणे बंधनकारक केल्यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यात मदत होणार आहे.

त्यामुळे कमी कॅरेटचे दागिने जास्त कॅरेटचे असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना पायबंद बसणार आहे. हॉलमार्क बंधनकारक केल्याने आता फक्त 14, 18 आणि 22 कॅरेटच्या दागिन्यांची विक्री करता येणार आहे. हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांची विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यास 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड, मालाची जप्ती तसेच एक वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com