समंथाची खूप परिश्रमानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार एन्ट्री

समंथाची खूप परिश्रमानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार एन्ट्री
samantha

समांथा अक्किनेनी (Samantha Akkineni) हे तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतले एक सुप्रसिद्ध नाव आहे. समांथा अक्किनेनी तिच्या जबरदस्त अभिनयामुळे दक्षिण इंडस्ट्रीत ओळखली जाते. त्यामुळे तिने दक्षिणेकडील सर्व लोकांची मनं जिंकली आहेत. आता समंथा हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवत आहे. समंथा 'द फॅमिली मॅन' (The Family Man-2) च्या दुसऱ्या सिजनमधून हिंदी चित्रपटसृष्टिमध्ये पाऊल ठेवले आहे. याच पार्श्ववभूमीवर समंथाबद्दल आपण खास गोष्टी जाणून घेऊयात. (Samantha will be entering the OTT platform after a lot of hard work) 

समंथा चालवते एनजीओ

समंथा चांगल्या अभिनया बरोबरच स्वतःचा एक एनजीओ देखील चालवते. तो एनजीओ समंथाने २०१२ मध्ये सुरु केला होता. हा एनजीओ महिला आणि लहान मुलांना विविध गोष्टीमध्ये मदत करतो. समंथा मानवतावादी आहे. एक चांगला समाज बनवण्यासाठी ती नेहमी प्रयत्नशील असते. समंथा अजून एका दुसऱ्या एनजीओ सोबत काम करते जो रस्त्यावरील जनावरांचे पालन पोषण करतो.    

 हे देेखील पाहा

प्रत्येक काम शिकण्याची तयारी
द फॅमिली मॅनमध्ये समंथाच्या भूमिकेचे नाव राजी आहे. सिरीजमध्ये ती एका कपड्याच्या दुकानात काम करत आहे. समंथाने या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. ती शिवण्याची कला शिकण्यासाठी कपड्याच्या दुकानात जात होती. तिथल्या कामगारांच्या मदतीने तिने कापडाच्या दुकाना संदर्भात सर्व कामं शिकून घेतले होते. 

भूमिकेसाठी प्रचंड मेहनत
समंथाने राजी भूमिका वास्तववादी वाटण्यासाठी खूप शारीरिक मेहनत केलेली आहे.  त्याचबरोबर, ती मोठ्या ट्रांसफॉर्मेशनमधून गेली आहे. या भूमिकेसाठी तिने तासंतास शारीरिक मेहनत केलेली आहे. समंथा या सिरीजमध्ये खलनायकाची भूमिका करत आहे. 

ओटीटीवर पदार्पण
'द फॅमिली मॅन 2' मधून समंथा डिजिटल डेब्यू करत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरती तिची ही पहिलीच सिरीज आहे. या सिरीजमध्ये समंथा खलनायकाच्या भूमिकेत असल्यामुळे तिने प्रचंड स्टंट केले आहेत. प्रेक्षकांनी पहिल्या भागाला प्रचंड डोक्यावर घेतलं होत. आता या सिरीजचा पुढचा भाग ४ जून रोजी अॅमेझॉन प्राईमवरती पाहायला मिळणार आहे.

Edited By : Pravin Dhamale 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com