संभाजीराजेंचा आंदोलनाचा इशारा, तर शाहू छत्रपतींचा सबुरीचा सल्ला

संभाजीराजेंचा आंदोलनाचा इशारा, तर शाहू छत्रपतींचा सबुरीचा सल्ला
raje and shahu

कोल्हापूर - मराठा आरक्षणावरून Maratha Reservation राज्यातील वातावरण तापल आहे. याच संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी कोल्हापूरचे Kolhapur शाहू छत्रपती यांची भेट घेतली. सरकार मराठा समाजासाठी काय करणार हे पवार यांनी शाहू महाराजांना सांगितलं, त्यानंतर शाहू छत्रपतींनी Shahu Chhatrapati मराठ्यांना सबुरीचा सल्ला दिला. Sambhaji Rajes warning of agitation

मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलनाच्या तयारीत आहे. खासदार संभाजीराजे  छत्रपती यांनी तर 16 जूनला आंदोलनाचा इशारा दिला आहे. यापार्श्वभुमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये येऊन कोल्हापूरचे राजे शाहू छत्रपतींची भेट घेतली.

न्यू पॅलेसमध्ये तब्बल 45 मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राजे शाहू छत्रपतींनी समाजाला सबुरीचा सल्ला दिला आहे. एकिकडे मराठा आरक्षणावरून सर्वच मराठा नेते राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यातच आज उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांची भेट झाल्याने घडामोडींना वेग आला आहे. Sambhaji Rajes warning of agitation

हे देखील पहा -

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व सध्या संभाजीराजे छत्रपती करत आहेत. एकिकडे त्यांनी सरकारला आव्हान देण्याची तयारी सुरू केली असताना शाहू महाराजांनी घेतलेल्या सबुरीच्या भूमिकेमुळे लढ्याची नेमकी दिशा स्पष्ट होत नाही आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com