कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेची पूर्वतयारी सुरू

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेची पूर्वतयारी सुरू
Sangli

सांगली - कोरोनाच्या Corona संभाव्य तिसऱ्या लाटेच्या Third Wave पार्श्वभूमीवर सांगली Sangli महापालिकेची पूर्वतयारी सुरू झाली आहे. याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेत बालरोगतज्ज्ञांची बैठक घेऊन मनपा क्षेत्रात टास्क फोर्स, हेल्पलाईन आणि चाईल्ड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. Sangli Corporation preparing for Corona Third Wave

तिसरी लाट आलीच तर महापालिका Muncipal Corporation प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज असेल, असा विश्वास मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी व्यक्त केला.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पालिका क्षेत्रात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आयुक्त कार्यालयात मनपाक्षेत्रातील बालरोगतज्ज्ञाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस डॉ शरद घाडगे, डॉ सतीश अष्टेकर, हर्षल वाघ, पंकज कुपवाडे, डॉ जी ए श्रीनिवास , डॉ सुधीर मगदूम, डॉ उज्वला गवळी, डॉ वसुधा जोशी, डॉ सुहास भावे , डॉ विठ्ठल माळी , डॉ अमीत तगारे आदी बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते.

याबैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा झाली. तसेच या तिसऱ्या लाटेत कशा पद्धतीने बालकांना याचा त्रास होऊ शकतो. यावर काळजी कशी घ्यावी, उपचाराच्या पद्धती कशा असतील याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी मनपा क्षेत्रात टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. Sangli Corporation preparing for Corona Third Wave

हे देखिल पहा - 

तसेच कोरोनाबाधित बालकांच्या पालकांसाठी  हेल्पलाईन सुरू करण्याचा आणि परिस्थिती आलीच तर चाईल्ड कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. 

मनपा क्षेत्रात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर आपली तयारी असली पाहिजे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व बालरोगतज्ज्ञ यांनी मनपाला सहकार्य करावे. जर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती आलीच तर महापालिका प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज असेल असा विश्वासही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. Preparations of Sangli Municipal Corporation started against the backdrop of possible third wave of Corona

Edited By - Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com