चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत...राऊत यांचा तिरका बाण

चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत...राऊत यांचा तिरका बाण
sanjay raut

चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवस साजरा करावा कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावे विशेष लहान मुलाप्रमाणे चंद्रकांत पाटलांकडे पाहावे. आम्ही पिंजऱ्यातील वाघाशी नव्हे तर जंगलातील वाघाशी मैत्री करतो चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार 5 वर्ष टिकेल, लोकसभा विधानसभा देखील लढवू, प्रत्येकाला वाटते की आपला मुख्यमंत्री व्हावा तो प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे ,नाना पटोले यांना वाटते की त्यांचा मुख्यमंत्री व्हावा त्यात काही गैर नाही. नाना पटोले यांनी आगामी मुख्यमंत्र्या बाबद केलेल्या वक्तव्यावर बोलताना राऊत यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करीत स्थानिक लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिकांनी साखळी आंदोलन केल्याच्या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले की दि.बा. पाटील हे स्थानिक नेते असल्याने त्यांच्या स्मारकाचा विचार करावा लागेल. परंतु सध्यातरी नवी मुंबई विमानतळास बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्थाव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे असे उत्तर राऊत यांनी दिले. (Sanjay Raut has criticized Chandrakant Patil)

हे देखील पाहा

राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट झाली. त्यावर बोलताना राऊत म्हणाले राजशिष्टाचार प्रमाणे बैठक होती आणखी झालेल्या चर्चेबाबद चंद्रकांत पाटलांना माहीत असल्याची कोपरखिळी राऊतांनी लगावली आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com